सॅनिटायझरचा अतिवापर ठरु शकतो घातक... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 10 May 2020

सॅनिटायझरचा अतिवापर ठरु शकतो घातक...


Pandharpur Live Online- कोरोना व्हायरसपासून बचाव करताना सध्या आपण सगळेच मोठ्या प्रमाणावर अल्कोहोल युक्त सॅनिटायझरचा वापर करत आहेत. पण हे सॅनिटायझर कोरोना विषाणूपासून जरी आपल्याला वाचवत असले तरीही त्याचे आपल्या शरीरावर काही दुष्परिणामही दिसून येत आहेत.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART





सॅनिटायझरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्क आहे. सॅनिटायझरचा वापर काळजीपुर्वक केला पाहिजे, अतिवापर केल्यास आरोग्यासाठी घातक आहे, असे त्वचारोग तज्ज्ञ सांगत आहेत.

जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असतानाच प्रत्येक नागरिकाला सर्वोत्तोपरी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्यातच वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यास सांगितले जात असल्यामुळे आपल्यापैकी अनेकजण पूर्वीपेक्षा जास्त वेळा हात साफ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहोत. आपल्या जेव्हा-जेव्हा हात धुणे शक्य नसते तेव्हा आपण सॅनिटायझरद्वारे बॅक्टेरिया आणि व्हायरस दूर ठेऊ शकतो. जेव्हा आपण बाहेर जाता त्यावेळी हात स्वच्छ धुण्यासाठी साबण आणि पाण्याचा उपलब्ध असतेच असे नाही. अशावेळी आपण आपल्यासोबत अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझरचा वापर करु शकतो. किंबहुना आपल्याला त्यावरच अवलंबून राहावे लागते.

 पण हँड सॅनिटायझर दररोज वापरण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. धोकादायक विषाणू अथवा किटाणू नष्ट करण्यासाठी सॅनिटायझर हे प्रभावी आहे आणि त्यामुळे बऱ्याच आजारांपासून आपला बचाव होता. परंतु यासंदर्भात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. शरीराच्या मायक्रोबायोम (सूक्ष्मजीव) काही प्रमाणात सॅनिटायझर परिणाम करू शकते. जो आपल्यासाठी योग्य ठरत नाही.

कोरोनासारख्या वाईट विषाणूंचा सॅनिटायझर नाश करते. पण त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी फायदेशीर असणारे जीवाणू देखील नष्ट करतो. जर असे वारंवार घडले तर मोठी समस्या उद्भवू शकते. यावरील एकमात्र उपाय म्हणजे लोकांनी सॅनिटायझरचा वापर सावधगिरीने केला पाहिजे. आपले हात स्वच्छ करण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे पाणी आणि साबण उपलब्ध नसेल तेव्हाच सॅनिटायझरचा वापर करा.

आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

add