पंढरपूर लाईव्हच्या वृत्ताची दखल... सांगोला तालुक्यातील गरीब कुटुंबाला मिळाला हक्काचा निवारा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 7 May 2020

पंढरपूर लाईव्हच्या वृत्ताची दखल... सांगोला तालुक्यातील गरीब कुटुंबाला मिळाला हक्काचा निवारा

 
पंढरपूर लाईव्ह स्पेशल रिपोर्ट (अशोक पवार)-
पंढरपूर लाईव्हनं दिलेल्या वृत्ताची व केलेल्या आवाहनाची दखल घेऊन पंढरीतील एका संवेदनशील व्यावसायिकाने सांगोला तालुक्यातील एका गरीब कुटुंबाला हक्काचा निवारा स्वखर्चातुन बांधुन दिलाय.

दोन महिन्यापूर्वी सांगोला तालुक्याच्या हलदहिवडी या गावातील पारशी कुटुंबाच्या घरावर वीज कोसळली... अवकाळी पावसाचं थैमान सुरु होतं... वीजांचा गडगडाट सुरु होता... यामध्ये मोलमजुरी करुन कसाबसा उदरनिर्वाह करणार्‍या पारशी कुटुंबाचा संसार उघडयावर पडला होता... घरातील संसारोपयोगी सगळं सामान जळुन खाक झाले  होते... 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

यासंदर्भातील बातमी पंढरपूर लाईव्ह चॅनल ने ठळकपणे प्रसिध्द करुन या कुटुंबाला मदतीचं आवाहन केलं होतं.  या बातमीची दखल घेवुन पंढरीतील प्रेरणा बीज भांडार चे संचालक मोहन पुरुषोत्तम कासट यांनी या कुटुंबाला भेट दिली. वस्तुस्थिती पाहुन त्यांनी या कुटंबाला त्यांच्या जागेत स्वखर्चातुन  पंधरा बाय बाराची 1 रूम टॉयलेट, बाथरुमसह बांधुन दिली. श्री. कासट यांनी तत्परतेने दीड-दोन लाख रुपये खर्च करुन कांही दिवसातच एका गरीब कुटुंबाला हक्काचा निवारा देवुन माणुसकीचे दर्शन घडवुन दिलेय. श्री.कासट यांच्या या सद्कार्याला पंढरपूर लाईव्हचा सलाम!

♦ सांगोला तालुका- गरिबाच्या घरावर वीज कोसळली... उघड्यावर पडला संसार... पैसा-अडका, संसारोपयोगी साहित्य जळुन खाक
https://www.pandharpurlive.com/2020/03/Sangola-Taluka-News.html?m=0

add