पंढरपूर न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे न्यायिक कामकाज - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 1 May 2020

पंढरपूर न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे न्यायिक कामकाज

Pandharpur Live- अतितातडीची प्रकरणे वकिलांना न्यायालयाच्या ई-मेल आयडी द्वारे दाखल करण्याची सुविधा मिळाल्याने संबधीत अधीक्षक/सहअधिक्षक हे संबधीत न्यायिक अधिकाऱ्याच्या निर्देशवरून प्रकरणाचे महत्त्व ठरवून व्हिडिओ कॉन्फरसिंग साठीची वेळ संबंधित वकील व पक्षकार यांना ई-मेल द्वारे कळवितात, मग व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे सुनावणी झाल्यावर न्यायाधीश आदेश जाहीर करतील, आणि त्या आदेशाची प्रत वकिलांचे ई-मेल वर देण्यात येते. त्याकरिता विडिओ कॉन्फरसिंग साठी प्लेस्टोर वर जाऊन Vidyo app डाउनलोड करणे आवश्यक आहे.

कोर्टाकडून प्राप्त झालेल्या लिंकवर कोर्टाने दिलेल्या वेळेत क्लिक करून जॉईन कॉन्फरन्स वर क्लिक करून ऑफिस मधून कोर्ट काम पूर्ण करता येत आहे त्याकरिता कोर्टात जाण्याची गरज नाही अशा प्रकारे पहिला दावा किरण मुरलीधर घाडगे यांनी दाखल केला होता व त्याची सुनावणी  कॉन्फरन्स व्दारे मा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कुंभार यांची समोर पूर्ण झाली तेव्हा वादीची वकील किरण घाडगे व प्रतिवादी चे वकील शिवराज पाटील यांनी सहभागी झाले होते. त्यानी व्ही. सी. वरून युक्तिवाद व न्यायिक कामकाज केले असेच प्रकारे दुसऱ्या ही एका प्रकरणात दाव्याची कामकाज झाले व न्यायाधीश साहेब श्रीमती कुंभार आर. सी. यांनी आदेश ही केले आहेत.

याकरिता सा अधीक्षक श्री मोरे आर व्ही ,ज्युनिअर क्लर्क इनामदार एम एच यांनी सर्व व्यवस्था पाहिली आहे.
वरील प्रकारे वकील वर्गाने ऑनलाइन अतिमहत्त्वाची प्रकरणे दाखल करून काम चालवू शकता पण सदर सुविधा फक्त lockdown काळासाठी आहे.

add