शेतकऱ्यांनी घरच्याघरी तपासा सोयाबीन बियाणाची उगवणशक्ती- तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 2 May 2020

शेतकऱ्यांनी घरच्याघरी तपासा सोयाबीन बियाणाची उगवणशक्ती- तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी तालुक्यात शेतकऱ्याचा कल मुख्यत्वे सोयाबीन व कापूस या पिकाकडे आहे. मागील खरीप हंगामात सुरवातीच्या काळात कमी पाऊस असून सुद्धा सोयाबीन चे पिक चांगले आले होते. परंतु शेतक-्यांनी सोयाबीन पिक काढल्यानंतर अवेळी पावसामुळे सोयाबीन चे नुकसान झालेले आहे. या मुळे चालू वर्षी सोयाबीन बियाणाची तुट जाणवण्याची शक्यता आहे. याही परीस्थित काही शेतकऱ्यांनकडे चांगल, बियाणे योग्य सोयाबीन असण्याची शक्यता आहे. अशा शेतकऱ्यांनी स्वत:ला लागेल एवढे बियाणे ठेवून, शिल्लक सोयाबीन, उगवण क्षमता तपासून इतर शेतक-्यांना विकण्यास हरकत नाही. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरणीपूर्वी वापरताना घरच्या घरी उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे. घरी उपलब्ध असलेले बियाणे पेरणीसाठी वापरताना उत्पादन वाढीसाठी बियाणाची उगवणक्षमता तपासून, रोगट किंवा फुटके बियाणे पेरणीसाठी वापरू नये. योग्य काळजी न घेता घरचे बियाणे पेरणीसाठी वापरल्यामुळे. आर्थिक नुकसानी बरोबर पेरणीचा हंगाम सुद्धा वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे नियाणे पेरणीसाठी वापरले पाहिजे..असे आवाहन परळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी केले आहे. 

सोयाबीन हे स्वपरागीत पिक असल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या जाती या सरळ वाणाच्या आहेत. त्यामुळे दरवषी बियाणे बदलण्याची आवश्यकता नसते. केवळ संकरीत वाणाचे बियाणे दरवर्षी बदलणे आवश्यक असते. परळी तालुक्यात कृषि कार्यालयाकडून शेतकऱ्यांकडे उपलब्ध सोयाबीन बियाणाची कृषि सहायक मार्फत नोंद घेण्याचे काम चालू आहे. तरी ज्या शेतक-यांकडे सोयाबीन उपलब्ध आहे त्यांनी त्यांचे संबंधित कृषि सहायक यांचे कडे बियाणे उपलब्धता कळवावी. यामुळे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन बियाण्याने उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले सोयाबीन बियाणे म्हणून पुरविले जाईल.यामुळे तालुक्यातील सोयाबीन बियाणाची तुट भरून निघेल व शेतकऱ्यांचे सोयाबीन सुद्धा योग्य दरात विकले जाईल. उगवण क्षमता तपासणीची प्रात्याक्षिके कृषि सहायकामार्फत त्यांचे कार्यक्षेत्रात दि.०४/०५/२०२० पासून देखाविण्यात येणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कृषि विभाग मार्फत चालविलेल्या या मोहिमेस उत्स्फुर्द प्रतिसाद द्यावा असे आवाहन परळी वैजनाथ तालुका कृषि अधिकारी अशोक सोनवणे यांनी केले आहे. या बाबत अधिक माहितीसाठी मंडळ कृषि अधिकारी परळी-१/२ । सिरसाळा , व पंचायत समितीचे कृषि अधिकारी , कृषि पर्यवेक्षक , कृषि सहायक यांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

add