जिल्ह्यात दोन लाख 82 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 3 May 2020

जिल्ह्यात दोन लाख 82 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन


अन्नधान्याच्या उत्पादनवाढीचेही उद्दीष्टय : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बिराजदार

            सोलापूर दि. 3 : खरीप हंगाम 2020 साठी सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 82 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली आहे.
            पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. त्या बैठकीत खरीप हंगाम नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार नियोजन करण्यात आल्याचे श्री. बिराजदार यांनी सांगितले.
            श्री. बिराजदार यांनी सांगितले की, खरीपाच्या पीक पेरणीच्या नियोजनाबरोबरच अन्नधान्य उत्पादनाचेही उद्दीष्टय निश्चित  करण्यात आले आहे. तृणधान्याचे 56816 मेट्रीक टन कडधान्याचे 76955 मेट्रीक टन असे अन्नधान्याचे एकूण 133771 मेट्रीक टनाचे उत्पादनाचे उद्दीष्टय निश्चित करण्यात आले आहे. गळित धान्याचे 44511 मेट्रीक टन उत्पादनाचे उद्दीष्टय निश्चित करण्यात आले आहे.
            श्री. बिराजदार यांनी सांगितले की, सन 2015 मध्ये पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे आणि त्यावर्षी उजनी धरणातील पाणी  पातळी खालावल्याने जिल्ह्यातील अनेक शेतक-यांनी  2016 च्या खरीप हंगामात ऊसाऐवजी तूर, उडीद, मका, सोयाबीनची पेरणी केली. पीक पध्दतीत झालेल्या बदलाचा शेतक-यांना फायदा झाला. तेव्हापासून खरीप हंगामात तूर, उडीद, मका आणि सोयाबीन खालील पेरणीत वाढ होत आहे.    2019-20 मध्ये ऊसाखालील लागवडीचे सरासरी क्षेत्र 1,65,800 हेक्टर आहे. मात्र आतापर्यंत 62108 हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली आहे, असे श्री. बिराजदार यांनी सांगितले.
            जमीन आरोग्य पत्रिका अभियान - यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच गावांची मॉडेल व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानुसार 55 गावांतील 53566 खातेदारांचे मृदा नमुने काढण्याचे नियोजन केले असल्याचेही श्री. बिराजदार यांनी सांगितले.
            बियाणे नियोजन - खरीप हंगाम 2020 साली 31,973 क्विंटल बियाण्याचे नियोजन आहे. पैकी 1080 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित बियाणे महाबीज आणि खासगी कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
            रासायनिक खतांचे नियोजन - हंगामासाठी 2,11,390 मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर आहे. पैकी एप्रिल महिन्यात 20655 मेट्रीक टन खत उपलब्ध झाले आहे. खरीप हंगाम 2019 मध्ये जिल्ह्यात 1,33,451 मेट्रीक टन विक्री झाली होती. जिल्ह्यात सर्वाधिक मागणी युरिया खताला असते, असे श्री. बिराजदार यांनी सांगितले. 

पिकवार खरीप नियोजन - बाजरी - 50 हजार हेक्टर, मका   - 29 हजार हेक्टर, तूर -  86800 हेक्टर , उडीद  -  36000 हेक्टर, मूग - 20000 हेक्टर, सूर्यफूल - 9000 हेक्टर, सोयाबीन - 46500 हेक्टर , ऊस  - 1,25,000 हेक्टर.
00000
लोकशाही दिन होणार नाही

            सोलापूर दि. 3: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन  वाढवल्याने, सोमवार  4 मे 2020 रोजी  जिल्हा लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

add