लॉकडाऊन काळात पंढरीतील दुकाने बंदच राहणार.... व्यापारी कमेटीच्या निर्णयाबद्दल आमदार प्रशांत परिचारक यांनी मानले आभार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 9 May 2020

लॉकडाऊन काळात पंढरीतील दुकाने बंदच राहणार.... व्यापारी कमेटीच्या निर्णयाबद्दल आमदार प्रशांत परिचारक यांनी मानले आभार


Pandharpur Live- शासनाने दि 17 मे 2020 पर्यत लॉकडाऊन करणेबाबत निर्णय घेतला आहे. त्यास अनुसरून जिल्हाधिकारी सो यांनी शहरातील दुकाने उघडण्याबाबत नगरपरिषदेला अधिकार दिले होते. त्यानुसार आज पंढरपूर शहरातील दुकाने चालू करणे बाबत नियोजन व निर्णय करणेसाठी सर्व व्यापारी बंधूशी चर्चा करणेकरिता आमदार प्रशांतराव परिचारक यांचे अध्यक्षतेखाली, नगराध्यक्ष सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी सर्व व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधी यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी नियोजन करावे असे सांगितले. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

यावर  मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचना व आदेशानुसार 1 कि.मी. लांबी असलेल्या क्षेत्रात बिगर अत्यावश्यक सेवेची प्रति कि.मी. 5 दुकाने एका तारखेला उघडी राहतील. तसेच एखाद्या रस्त्यावर 10 दुकाने असल्यास सम-विषम तारखेस दुकाने उघडे ठेवता येतील व 15 दुकाने असल्यास 1, 4, 7, 10 अशा क्रमांकाची दुकाने उघडी ठेवण्यास परवागनी देता येईल मात्र सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळावा, मास्कचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन केले.
घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

 यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी कोरोना विषाणू व्हायरसचा प्रादुर्भाव संपु्र्ण देशात व सोलापूरमध्ये थैमान घालत आहे. अनेक लोक यामध्ये बाधीत होवुन मृत्युमुखी पडत आहेत. आपल्या शहरापासुन 70 कि.मी.वर असलेल्या सोलापूर मध्ये दररोज मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळुन येत आहेत. हि बाब लक्षात घेता धोका आपल्या दरवाज्यापर्यंत येवुन ठेपला आहे. त्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळणे आवश्यक आहे. जर आपण दुकाने चालू केल्यास व एखाद्या बाहेरुन आलेल्या व्यक्तीमुळे कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यास आपण व आपले कुटुंब अडचणीत येणार आहे. त्यामुळे आपणा सर्वांना विनंती करतो की, गेला एक ते दीड महिना स्वयंशिस्त पाळून कोरोना विषाणुला रोखुन धरले आहे आणि लॉकडाऊन संपण्यास 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे आपण या शहरातील नागरीकांचे सुरक्षतेच्या दृष्टीने 17 तारखे पर्यंत लॉक डाऊन पाळावा असे भावनिक आवाहन उपस्थित असलेल्या व्यापा-यांना केले. 

त्यावर सर्व व्यापारी असोसिएशनच्या पदाधिका-यांनी एकमुखाने आमदार प्रशांत परिचारक यांचे आवाहनाला प्रतिसाद देत 17 मे 2020 पर्यंत लॉक डाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. यावर नगराध्यक्ष सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी बोलताना पंढरपूर शहरातील नागरीक व व्यापा-यांनी आतापर्यंत लॉकडाऊन पाळुन सहकार्य केलले आहे. 

आज झालेल्या व्यापारी प्रतिनिधींच्या बैठकीत शहरवासीयांची सुरक्षिततता अबाधित ठेवण्यासाठी दि.17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन पाळण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद असुन आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व व्यापारी बंधुंचे व नागरीकांचे आभार व्यक्त केले. तसेच दि.17 मे 2020 पर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील अशी दक्षता घ्यावी. या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते व उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगरसेवक राजू सर्वगोड, विवेक परदेशी, संजय निंबाळकर, विक्रम शिरसट, डी.राज सर्वगोड, सत्यविजय मोहोळकर, धर्मराज घोडके, सर्व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, प्रिन्स गांधी, धीरज म्हमाने, राहुल शिंदे, राजेश कपडेकर, राजगोपाल भट्टड, संतोष कवडे, सुनील शिंदे, शैलेश घोगरदारे, प्रशांत झिंजुर्टे, जुगलकिशोर बाहेती, गजेंद्र माने, गांडूळे, दोशी, ज्ञानेश्वर साळुंखे, पांडुरंग बापट, राहुल उत्पात, वांगीकर व इतर व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.

add