सोलापूर जिल्ह्यातील तीनशे तेवीस औद्योगिक प्रकल्प सुरु - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 9 May 2020

सोलापूर जिल्ह्यातील तीनशे तेवीस औद्योगिक प्रकल्प सुरु


सोलापूर दि. 9 : लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आलेले जिल्ह्यातील कारखाने सरु होत आहेत. सध्या जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम असे 323 औद्योगिक प्रकल्प सुरु झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले औद्योगिक प्रकल्प सुरु करण्यासाठी permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करायचा होता. अर्ज केलेल्या 567 औद्योगिक प्रकल्पापैकी सर्वांना प्रकल्प सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी 323 औद्यागिक प्रकल्प सुरु झाले असून त्यामध्ये 7152 कामगार आहेत. 140 औद्योगिक प्रकल्पांनी 388 वाहनांसाठी पासची मागणी केली आहे. मात्र अद्याप या वाहनांना पास देण्यात आले नसल्याचे समन्वय अधिकारी महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते यांनी सांगितले.
घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

add