पंढरीतील अधिकाऱ्यांनी पालवीत साजरा केला मातृदिन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 10 May 2020

पंढरीतील अधिकाऱ्यांनी पालवीत साजरा केला मातृदिन


Pandharpur Live- पंढरपूर, ता.१०: जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने रविवारी (ता.१०) पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी स्वखर्चाने येथील पालवी संस्थेला किराणा साहित्य देऊन मोलाची मदत केली. येथील पालवी संस्थेमध्ये एचआयव्हीग्रस्त बालकांचे संगोपन व पुनर्वसन केले जाते. 10 मे हा दर वर्षी जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या मातृ दिनी श्री मानोरकर व श्री घोडके यांनी स्वखर्चाने पालवी संस्थेस मदत देऊन अनोख्या पद्धतीने साजरा केला.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART
गट विकास अधिकारी श्री. घोडके यांच्या मातोश्री सौ सुलोचना घोडके सध्या आजारी आहेत. त्या कॅन्सर शी लढा देत असून दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. नियत वयोमानाने 31 मे रोजी त्या निवृत्त होणार आहेत .एक हाडाच्या व पोटतिडकीने शिक्षण देणाऱ्या शिक्षिका म्हणून त्याचा गौरव झालेला आहे. आज जागतिक मातृ दिनाचे औचित्य साधून श्री. घोडके व श्री. मानोरकर या संवेदनशील मनाच्या अधिकाऱ्यांनी पालवी संस्थेस अत्यावश्यक अशा किराणा साहित्याची मदत केल्याबद्दल संस्थेच्या संस्थापिका मंगलताई शहा व डिंपल घाडगे यांनी त्यांचे आभार मानले.

add