बाहेरगावहून पंढरीत आलेल्या नागरिकांसह होम कॉरंटाईन केलेल्या नागरिकांची निमा च्या डॉक्टरांकडून 14 दिवस होणार दररोज तपासणी! कोरोनाला रोखण्यासाठी पंढरपूर प्रशासनाला ‘निमा’ चे सहकार्य! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 7 May 2020

बाहेरगावहून पंढरीत आलेल्या नागरिकांसह होम कॉरंटाईन केलेल्या नागरिकांची निमा च्या डॉक्टरांकडून 14 दिवस होणार दररोज तपासणी! कोरोनाला रोखण्यासाठी पंढरपूर प्रशासनाला ‘निमा’ चे सहकार्य!


पंढरपूर लाईव्ह- संपुर्ण जगभरात कोरोना ने थैमान घातले असताना या कोरोनाला रोखण्यासाठी पंढरपूर प्रशासन,नगरपालिका पंढरपूर व निमा चे पंढरपुरमधील डॉक्टर आता सज्ज झाले आहेत. पंढरपूर शहरात बाहेर गावाहून येणार्‍या नागरिकांवर पंढरपूर प्रशासनाची आता बारीक नजर आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

प्रांताधिकारी सचिन ढोले , नगरपालिकचे मुख्याधिकारी आनिकेत मनोरकर,  यांचे सुचनेनुसार बाहेर गावावरुन येत असलेल्या नागरिकांच्या तपासणीसाठी पंढरपूर निमा च्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची गावात प्रवेश करण्याआधी पोलिसांकडून   कोणत्या गावाहून आला आहे? याची चौकशी केली जाते,उप-जिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे त्यांची तपासणी करुन ठरविले जाते की त्यांना होम कॉरंटाइन करायचे का इनस्टिटुशनल कॉरंटाइन.

पैकी होम कॉरंटाइन नागरिकांच्या हातावर होम कॉरंटाइन असा शिक्का मारला जातो. या नागरीकांची निमा डॉक्टर व नगरपालिका कर्मचारी यांचे मार्फत 14 दिवस दररोज तपासणी करून लक्ष ठेवण्यात येणार आहे. तरी या कामाला दि 06 मे पासुनच निमा डॉक्टरांनी सुरुवात केली असुन त्यांच्या या कामाचे प्रांतआधिकारी सचिन ढोले यांनी विशेष कौतुक केले आहे.  निमा पंढरपुर चे सचिव डॉक्टर सोमनाथ शिंदे यांनी पंढरपूर लाईव्हला यासंदर्भात माहिती दिली आहे.  निमा पंढरपूरचे अध्यक्ष
डॉ. व्हनमाने,उपाध्यक्ष डॉ. जमदाडे,मार्गदर्शक डॉ. डि. डि. देशपांडे यांनी निमा हि आयुष डॉक्टरांची संघटना नेहमीच रुग्णसेवेला व प्रशासनाला सहकार्य करायला तयार असल्याचे सांगितले. 

add