कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंढरीतील पत्रकारांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या प्राणरक्षक आयुर्वेदीक काढ्याचे वाटप... आयुर्वेदीक वैद्य डॉ.आबासाहेब रणदिवे यांचा स्तुत्य उपक्रम Pandharpur Live - 
आज पंढरपूर पत्रकार भवनमध्ये रोगप्रतिकारक, शक्तीवर्धक अशा प्राणरक्षक काढ्याचे नि:शुल्क वाटप पंढरीतील पत्रकार बांधवांना करण्यात आले. श्रीविश्‍वरंग आयुर्वेद, पंढरपूर चे वैद्य डॉ.आबासाहेब रणदिवे यांनी या काढ्याची निर्मिती केलेली आहे. आज कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पत्रकार बांधवांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या उद्देशाने आयुर्वेदीक वैद्य आबासाहेब रणदिवे यांनी पत्रकार बांधवांना या काढ्याचे चुर्ण वितरीत  केले. यावेळी सर्व पत्रकारांची थर्मल टेस्टींगही करण्यात आली. 

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


काढा वापरण्याची पध्दत

Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


यावेळी  डॉ. आबासाहेब रणदिवे यांनी सांगितले की, ‘‘हा काढा पंढरपूर तालुक्यातील कोरोंटाईन केलेल्या अनेकजणांना हा काढा नियमित देत आहोत, याचा उत्तम परिणाम झालेला जाणवत आहे. कोरोंटाईन व्यक्तींसह सर्वप्रथम पंढरपूर तालुक्यातील पत्रकार, पोलीस, आरोग्य कर्मचारी, अधिकारी व पत्रकार बांधवांना हा काढा मोफत देत आहोत.’’ असे सांगुन त्यांनी हा काढा कसा वापरायचा यासंदर्भातील माहितीही यावेळी दिली. यावेळी डॉ. शितल कुलकर्णी, डॉ. नेहा रणदिवे आदींची उपस्थिती होती.