देवदुतच निघाला यमराज... पोलीसांच्या रुपात भेटले देवदुत... आणि एका रुग्नाचे वाचले प्राण! पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या प्रसंगावधानामुळे मद्यधुंद अ‍ॅम्ब्युलन्स चालक गजाआड - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 9 May 2020

देवदुतच निघाला यमराज... पोलीसांच्या रुपात भेटले देवदुत... आणि एका रुग्नाचे वाचले प्राण! पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या प्रसंगावधानामुळे मद्यधुंद अ‍ॅम्ब्युलन्स चालक गजाआड


भिमानगर (प्रतिनिधी):- दि. 08.05.2020
सध्या कोरोना आणी लॉक डाऊन आणी जिल्हा बंदीच्या अनुषंगाने भिमानगर (पुणे-सोलापुर महामार्ग) ता. माढा जि. सोलापुर येथे सोलापुर ग्रामीण पोलीसांचे वतीने नाकाबंदी पॉईंट नेमला असुन सध्या डोळ्यात तेल घालुन कडक नाकाबंदी चालु आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

शुक्रवार दि. 08.05.2020 रोजी रात्रौ 9 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव, पोलीस उप निरीक्षक हनुमंत वाघमारे, पो हवा. दौंड, सुतार, रोहिले, पो. ना. ढाणे, बोरकर, भोसले, गुंड, पवार, हाके, चौभे, कांबळे, गायकवाड पो. कॉ. कदम, निमगिरे, म.पो. कॉ. आखाडे, शेळके, पोलीस मित्र राजेंद्र बनसोडे, बापु गलांडे, सचिन कदम नाकाबंदी आणी वाहन पास-परमीट तपासणी करीत असताना पुणे कडुन एक अंबुलन्स एम. एच. 12 सि. एफ. 9701 येताना दिसली. पोलीस निरीक्षक जाधव यांना संशय आल्याने थांबवुन तपासणी करण्यास सांगितले असता अंबुलन्स चालक अमोल दहीहंडे रा. पुणे हा मद्य प्राशन करून असल्याचा संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता जखमी पेशंट यास पुणे येथुन दवाखान्यातुन घेवुन लातुर येथे सोडवण्यास जात असल्याचे सांगितले, संशय आल्याने चालक अमोल दहीहंडे यास खाली उतरवुन बारकाईने चौकशी केली असता त्याने मद्य प्राशन केल्याची खात्री पटली. 
घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

यातील पेशंट रा. लातुर सध्या पुणे यांच्याकडे विचारपुस केली असता मी आय टी कंपनीत इंजिनिअर असुन काही दिवसांपुर्वी माझा अ‍ॅक्सिडेंट झाला होता, त्यात माझा पाय फ्रॅक्चर झाल्याने मी हॉस्पिटलला ऍडमिट होतो. लॉक डाऊनमुळे माझे नातेवाईक लातुर मध्ये अडकुन पडले होते. आज मला डीस्चार्ज मिळाल्याने भाड्याने अ‍ॅम्ब्युलन्स करून लातुरला गावी चाललो आहे असे सांगितले. अ‍ॅम्ब्युलन्स चालक याच्या मद्य प्राशन बाबत विचारले असता मध्ये वाटेत दोन वेळा थांबला होता, माझी तब्येत ठिक नसल्याने मी झोपुन होतो अशी माहीती मिळाली. मला शंका आल्याने मी त्यास विचारले असता तू गप झोप नाहीतर तुला मारून टाकेन असा दम दिल्याचे सांगितले. 

अ‍ॅम्ब्युलन्स चालकास मद्य प्राशन केल्याच्या वैद्यकीय तपासणीकामी पाठवले असता मद्य प्राशन केल्याचे आढळुन आल्याने पो.  ठाणे टेंभुर्णी येथे अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचे विरोधात मद्य प्राशन करून वाहन चालवणे या सदरा खाली गुन्हा दाखल केला आहे. आज न्यायालयात हजर केले जाणार होते.

रात्री उशिरा संबंधीत रुग्नाच्या याच्या नातेवाईकांना लातुर येथुन बोलावून घेवुन त्यास नातेवाईकांकडे सुपुर्द केले.
सदर अ‍ॅम्ब्युलन्सचा परवाना आणी अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचे लायसन्स कायम स्वरूपी रद्द करणे करिता प्रादेशिक परिवहन विभागाकडे अहवाल पाठविणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी सांगितले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, उप विभागीय पोलीस अधिकारी करमाळा डॉ. श्री. प्रशांत हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

add