चंद्रभागेच्या पैलतीरावरील 65 एकर परिसरात उभे राहणार कोविड-19 रुग्णालय... आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केली पाहणी


      Pandharpur Live -  पंढरपूर शहरात कोरोना बाधीत रुग्णांवरील उपचारासाठी कोविड-19 हॉस्पिटल उभे राहणे आवश्यक बनले आहे; परंतु पंढरपूर शहरामध्ये कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी होणारा स्थानिक नागरिकांचा विरोध लक्षात घेता सदर हॉस्पिटल चंद्रभागेच्या पैलतीरावरील 65 एकर परिसरात म्हणजेच ‘भक्तीसागर’ येथे उभारण्यात यावे असा प्रस्ताव आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मांडला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणुन आज आमदार पेशांतराव परिचारक यांनी  65 एकर परिसरात जाऊन पाहणीही केली. यावेळी नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर पक्षनेते गुरुदास अभ्यंकर ,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,  उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर आरोग्य समिती सभापती  विवेक  परदेशी,  नगर अभियंता नेताजी पवार डॉ,पारस राका  आदी उपस्थित होते.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

सध्या सर्वत्र कोरोना  विषाणूचे थैमान चालू आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे व सध्या शहरात बाहेर गावावरून अनेक लोक येत आहेत तसेच या लोकांमुळेच   पंढरपूर शहरामध्ये  सध्या कोरानो विषाणूचे बाधित रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहेत. उपजिल्हा रुग्णालय येथे अशा बाधित व्यक्तींना भरती करण्यास अथवा उपचार करण्यास स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे; या पार्श्वभूमीवर भविष्यात शहराची परिस्थिती बिकट झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून 65 एकर येथे 50 खाटांचे रुग्णालय उभे करता येईल का? यादृष्टीने आज आमदार प्रशांतराव परिचारकयांनी पाहणी केली. यावेळी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेऊन या रुग्णालयात सर्व सेवा सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कारवाई करावी अशी सूचना नगराध्यक्ष यांना दिल्या. यावर नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यांनी सोमवार दिनांक 1 जून रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषद सभागृहामध्ये विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली असून या सभेमध्ये यावर चर्चा होऊन मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांसाठी लवकरात लवकर 65 एकर येथेे कोविड19 रुग्णालय उभा करण्यात येणार  असल्याची माहिती नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी दिली आहे.