पंढरपूर शहरातील प्रमुख भाग झाला सील... नागरिकांना सतर्कतेचे आवाहन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Thursday, 28 May 2020

पंढरपूर शहरातील प्रमुख भाग झाला सील... नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


Pandharpur Live -  काल पंढरपूर शहरातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर प्रशासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.  शहरातील ते कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण विलगीकरण कक्षात ठेवले होते परंतु याआधी त्यांच्या परिसरातील काही लोकांचा संपर्क झाल्याची शक्यता व त्यांना जेवणाचे डबे पोहचविण्यासाठी जात असलेले त्यांचे पंढरपूर मधील नातलग यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून पंढरीतील संबंधित परिसर सील केला आहे. 

मुंबई येथून आलेले व्यक्तींना वाखरी येथील एम.आय.टी.मध्ये तर पंढरपूरच्या एका व्यक्तीला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात विलगीकरण कक्षात क्वारंटाईन केले होते. अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. शहरातील नागरिकांनी वारंवार सॅनिटायझर चा वापर करणे, घरीच राहणे व सतर्क राहणेचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. 


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

पंढरपूर शहरातील खालील प्रमुख भाग सुरक्षिततेच्या दृष्टीने  सील करण्यात आला आहे. - पंढरपूर शहरातील सावरकर चौक ते इंदिरा गांधी चौक ते अर्बन बँक ते शिवाजी चौक ते सावरकर चौक असा हा संपूर्ण चौरस एरिया सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सील करण्यात आला असून या परिसरातील नागरिकांनी विनाकारण किंवा कोणत्याही बहाण्याने बाहेर पडू नये घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे खबरदारीच्या उपाययोजना अमलात आणून प्रशासनाच्या नियमांचे पालन करावेअसे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Ad