पंढरपूर तालुका कोरोनामुक्तच राहण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या महत्वपूर्ण सुचना - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 17 May 2020

पंढरपूर तालुका कोरोनामुक्तच राहण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या महत्वपूर्ण सुचना

Pandharpur Live- 
सर्व कोरॉना वॉरियर्स, वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य कर्मचारी ;ग्राम स्तरीय कमिटी,वॉर्ड स्तरीय कमिटी यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी खालील प्रमाणे महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत.  जेणेकरून पंढरपूर तालुका कोरोना मुक्तच राहील. 
(प्रतिकात्मक छायाचित्र)

१)सर्व रेड झोन मधून व containment zone मधून आलेल्या लोकांना अत्यंत प्राधान्याने त्याचा सहवास  इतर कोणत्याही लोकांशी येणार नाही या दृष्टीकोनातून संस्थात्मक किंवा घरी अलागिकरण करणे व त्यांचा फॉलोअप फॉर्म no २ प्रमाणे २८ दिवस करिता आलेल्या दिनांकापासून भरणे त्याच्या लक्षणावर त्याला विश्वासात घेऊन माहिती विचारणे .या करिता आपण तयार केलेल्या containment zone plan मधील कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करावी.त्याचा फॉलोअप दररोज घेण्यात यावा.

२) ऑरेंज व ग्रीन झोन मधील आलेल्या लोकांना घरी अल गी करन करावे.


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART


३)त्यांना लक्षणे दिसू लागली की त्वरित तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक .नगरपालिका आरोग्य अधिकारी यांना कळवावे.संबधित वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग यांना कळवावे जेणेकरून त्याचा swab घेणे किंवा तपासणी करणे कोविड केअर सेंटर, कोवि ड  हॉस्पिटल माध्यमातून करता येईल.
४)वयस्कर लोक ५० वर्ष पुढील, डायबेटिस, बी पी,कॅन्सर,इतर दुर्धर आजार ,रोगप्रतिकार शक्ती असणारे लोक यांची गावनिहाय,शहरात वॉर्ड निहाय यादी करावी व त्यांची तपासणी व त्यांचे घरी ,संस्था व्यवस्थित अलग राहतील या करिता समुपदेशन करावे व निश्चित पणे जास्तीत जास्त काळजी घ्यावी.यांना धोका जास्त आहे.

आपण कोरोना बरोबर घेऊन जगतो आहे असे गृहीत धरूनच सामाजिक अंतर,मास्क वापर,हातांची स्वच्छता,परिसर व वस्तूंची स्वच्छता,विनाकारण नाकाला,तोंडाला,डोळ्याला,हात लागणार नाही याची दक्षता घ्याल व घेण्यास प्रवृत्त कराल या मोठ्या अपेक्षा जेणेकरून पंढरपूर तालुक्यात कोरोना प्रसार वाढणार नाही व तालुक्यातील आपले सर्वजण सुरक्षित राहतील.
- डॉ एकनाथ बोधले
(तालुका आरोग्य अधिकारी ,पंढरपूर)

add