पंढरपूरातून श्रमिक विशेष रेल्वेने 918 नागरिक झारखंडकडे रवाना - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 21 May 2020

पंढरपूरातून श्रमिक विशेष रेल्वेने 918 नागरिक झारखंडकडे रवाना

पंढरपूर लाईव्ह- पंढरपूर.दि.21 : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये  विविध ठिकाणी अडकलेले झारखंड येथील 918 नागरिक  पंढरपूर रेल्वे स्थानकातून  विशेष श्रमिक रेल्वेने झारखंडकडे रवाना करण्यात आले.   पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन आज दुपारी  2.00 वाजता झारखंडकडे 918 नागरिक रवाना करण्यात आले. यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे, मंडलाधिकारी  समिर मुजावर तसेच रेल्वे स्टेशनचे प्रबंधक जे.पी. चनगौड, वरीष्ठ अभियंता आर.एस गव्हाणे  
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

               यावेळी सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी व थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. प्रशासनाकडून रेल्वेमध्येच  पाणी व फुड पॅकेटची सोय करण्यात आली होती. रेल्वे डब्यात सामाजिक अंतर ठेवून त्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. तत्पुर्वी पंढरपूर रेल्वे स्थानकात संपूर्ण रेल्वेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. सदर रेल्वे झारखंडमधील  जासिडीह  येथे शनिवारी रात्री 01.30 वाजता पोहचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

           सोलापूर, लातुर तसेच सांगली  जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या झारखंड राज्यातील  918 नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील माढा 83, बार्शी 36, मोहोळ  67, पंढरपूर 138, करमाळा 196, सांगोला 79, द.सोलापूर 80, उ.सोलापूर-30, अक्कलकोट 50, माळशिरस 24, मंगळवेढा 18, तसेच लातुर येथील -11, सांगली जिल्ह्यातील सांगली-56, कवठेमंहाकाळ-08,  कडेगांव विटा 42 येथील 918 नागरिकांना पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन स्वगृही रवाना करण्यात आले.

add