मालेवाडीत कोरोनाला " नो एन्ट्री" - भुराज बदने


Pandharpur Live- 
सर्व गावची तपासणी करून जनतेमध्ये केली जनजागृती
निर्जंतुकीकरण करून नागरिकांना वाटले 
मोफत मास्क, नागरीकांची केली तपासणी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मालेवाडीत कोरोनाला सर्व गावकर्‍यांच्या सहकार्याने "प्रवेश बंदी" करण्यात आली असल्याची माहिती सरपंचपती भुराज बदने यांनी दिली. गावातील बहुसंख्य नागरीकांची तपासणी करून घेण्यात आली आहे. संपुर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले असुन ग्रामस्थांना मास्कचे मोफत वाटप करून कोरोविरोधात लढण्यासाठी नागरीकांना सज्ज करण्यात आल्याचेही बदने यांनी सांगितले.

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात "जनता कर्फ्यू लागू झाल्यापासून मालेवाडी ग्राम पंचायतने गावात कोरोना विरोधात आघाडी उघडली. गावात चोहीकडे स्वच्छता मोहीम राबवली, सर्व भागात निर्जंतुकीकरण करून घेतले. घरोघरी जाऊन जनजागृती केली तर कोरोना रोगाची लक्षणे सांगणारी पोस्टर्स लावण्यात आली. एवढेच नव्हे तर 850 नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे ग्राम पंचायतने नागरीकांना मोफत मास्कचेही वाटप करण्यात आले. 

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MARTमालेवाडीचे सरपंचपती भुराज बदने सांगत होते. आम्हाला या कामात नागरीकांनी मोलाचे सहकार्य केले. गावच्या सरपंच सौ. वैशाली बदने, उपसरपंच आदिनाथ बदने,  ग्राम सेवक रणजित काकडे, तलाठी पंडित, ग्राम पंचायत मेंबर सोमनाथ पोटभेरे, महादेव बदने,  धोंडीब गुट्टे, स्तवशील कसबे संजय राठोड वामन कतकडे पोलीस पाटील दत्तात्रय डुंमने अशा वर्कर्स अंगणवाडी सेविका अशा सर्व मंडळीचे सहकार्य लाभले असल्याचे भुराज बदने यांनी सांगितले.

       आमच्याकडे ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणावर आले आहेत, मात्र त्यांची तपासणी करून क्वारंटाईन करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी भागातुनही सुमारे 115 नागरीक गावी आले आहेत. बाहेरून आलेल्या सर्वांची घाटनांदूर आरोग्य उप केंद्रातील वैद्यकीय अधिकारी श्री डॉ. मुंडे डी यु यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाईन केले आहे. शाळा, ग्राम पंचायत कार्यालय, समाज मंदिर आदी ठिकाणी सर्वांची सोय करण्यात आली आहे.

         लाॅक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरीकांची आणि बाहेरून आलेल्या नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वांना अन्नधान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे. गोरगरीब आणि ऊसतोड मजूर यांनाही अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. पाण्याचे टँकर शमीना  किराणा किट चे वाटप करण्यात आले आहे कुणालाही कसलीही अडचण येणार नाही याची काळजी ग्राम पंचायत घेत असल्याचे बदने यांनी सांगितले.

       कोरोनाशी लढताना आरोग्य विभाग प्रभावी असण्याची गरज आहे त्यामुळे शासनाने गावोगावी आरोग्य केंद्र द्यावे आणि तिथे एक परिचारिका कायम ठेवुन डॉक्टरांची भेट ठेवावी अशी अपेक्षा भुराज बदने यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मालेवाडी आणि ग्रामस्थ सज्ज असुन सर्वजण आवश्यक ती खबरदारी घेत असुन यामुळेच आमच्या गावात कोरोनाला प्रवेश दिला जाणार नाही असेही बदने यांनी सांगितले.