व्यावसायिकांनी आरोग्याच्यादृष्टिने उपाययोजना कराव्यात- प्रांतधिकारी सचिन ढोले यांच्या सूचना - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 21 May 2020

व्यावसायिकांनी आरोग्याच्यादृष्टिने उपाययोजना कराव्यात- प्रांतधिकारी सचिन ढोले यांच्या सूचना

पंढरपूर लाईव्ह- 

           पंढरपूर.दि.21 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तालुक्यातील सर्व व्यावसायिकांना  दुकानातील कामगार तसेच येणाऱ्या ग्राहाकांसाठी आरोग्याच्यादृष्टिने उपाय योजना कराव्यात अशा सूचना प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.
              लॉकडाऊनच्या कालावधीत  पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये 10 ते 20 मे 2020 या कालावधीत परराज्यातून व परजिल्ह्यातून  सुमारे चार हजार नागरिक आलेले आहेत. तसेच 31 मे पर्यंत परजिल्ह्यात व परराज्यात अडकलेले नागरिक येणार  आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक गरजेसाठीच बाहेर पडावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी  केले आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

            राज्य शासनाच्या नवीन आदेशान्वये  22 मे 2020 पासून  अटी व शर्तीसह  इतर दुकाने  सुरु होणार आहेत. व्यापाऱ्यांनी  आपली दुकाने चालू केल्यानंतर राज्यशासनाच्या सुचनेनुसार सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून दुकाने सुरु ठेवावीत. व्यावसायिकांनी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. यासाठी सामाजिक अंतर ठेवावे. त्यासाठी आवश्यक कार्यपध्दती तयार करावी. तसेच दुकानात सॅनिटायझर व मास्कचा वापर अनिवार्य करावा. खरेदीसाठी दुकानात आलेल्या ग्राहकांच्या रांगेचे व्यवस्थापन दुकानातील कामगारांकडून करुन घ्यावे. त्याचबरोबर दुकानदारांनी घरपोच सेवा देण्याचा जास्तीतजास्त  प्रयत्न करावा त्यासाठी योग्य नियोजन करावे, असे श्री. ढोले यांनी सांगितले.
            त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने गर्दी होणाऱ्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जाता आहे नाही यावर लक्ष ठेवावे. तसेच नगरपालिकेने शहरात निर्जंतुकीकरणाची मोहिम व्यापक पध्दतीने राबवावी. तसेच वार्डस्तरीय समिती व ग्रामस्तरीय समितीने  होम क्वारंटाईन व संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना दररोज भेट द्यावी अशा सुचनांही श्री. ढोले यांनी यावेळी दिल्या.
            परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सजग नागरीकांनी आवश्यक कामासाठी  घराबाहेर पडावे असे आवाहनही श्री. ढोले यांनी केले आहे.

add