धक्कादायक! मुंबई पाठोपाठ पुण्यातही कर्तव्य बजावताना पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू... मुंबईत आयपीएस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 5 May 2020

धक्कादायक! मुंबई पाठोपाठ पुण्यातही कर्तव्य बजावताना पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू... मुंबईत आयपीएस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागणPandharpur Live Online- 
पुणे : शहर पोलीस दलातील कोरोना बाधित सहायक पोलीस उपनिरीक्षकांचा सोमवारी दुपारी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची चिंताजनक घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच आता  मुंबई मध्य प्रादेशिक विभागातील एका पोलीस उपायुक्तांनाही कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई पाठोपाठ पुण्यातही कर्तव्य बजावत असताना पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहराच्या मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यात ५७ वर्षांचे हे सहायक पोलीस उपनिरीक्षक नेमणुकीस होते. या पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सर्वप्रथम कोरोना बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांने कोरोनावर मात केली असून दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांच्याबरोबरच लागण झालेल्या ७ जणांवर उपचार सुरु आहेत.

या पोलीस कर्मचाऱ्याला त्रास सुरु झाल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र, व्हॅटिलेटर नसल्याचे कारण देत या रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर आणखी एका रुग्णालयाने त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे ३ ते ४ तास हे कुटुंब उपचारासाठी मदत मागत होते. ही बाब एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी २४ एप्रिल रोजी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 

त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी त्यांचे निधन झाले. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला.
मुंबईत आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
 राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढत असताना मुंबई मध्य प्रादेशिक विभागातील एका पोलीस उपायुक्तांनाही कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे.                     नागपाडा, ताडदेव, वरळी, आग्रीपाडा, भायखळा, एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याची जबाबदारी या अधिकाºयावर आहे. या भागात प्रतिबंधित क्षेत्राचे प्रमाणही अधिक आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्याकडे काम करणाºया काही कर्मचाऱ्यांनाही क्वॉरंटाइन केले आहे. सोमवारी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे आणखी १२ कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

add