माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर भाजपा पदाधिकार्‍यांचे राजीनामा सत्र सुरु... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 11 May 2020

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर भाजपा पदाधिकार्‍यांचे राजीनामा सत्र सुरु...

धनराज गुट्टे यांचा पहिला राजीनामा 
Pandharpur Live -परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपने विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक , भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष श्री धनराज गुट्टे यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाचा पहिला राजीनामा देऊन पंकजाताई मुंडे यांना तिकीट नाकारल्याचा राग व्यक्त केला आहे . राज्यभरात अनेकजण राजीनामे देत आहेत पण पहिला नंबर लागला तो धनराज गुट्टे यांचाच...
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


श्री गुट्टे हे माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू सहकारी व कट्टर समर्थक म्हणून गेल्या 12 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत . श्रीमती मुंडे वर जर कुणी साधी टीका जरी केली तर गुट्टे महाराष्ट्र भर आंदोलन करून त्या व्यक्तीचा निषेध करतात. कट्टर समर्थक कसा असावा तर तो धनराज गुट्टे सारखा अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते . विधान परिषद तिकीट कापल्यानंतर पंकजा मुंडे साठी राजीनामे देणारे पाहिले मुंडे सैनिक ठरले आहेत धनराज गुट्टे . 
त्याबद्दल सर्व मुंडे समर्थकाकडून त्यांचे कौतुक होत आहे . श्री गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले ''जगतोय ताई साठी मरणार ही ताई साठी' '

add