लॉकडाऊनच्या काळात पंढरीत रंगले राजकारण... नगरपालिका विकली गेल्याचा आमदार भालकेंचा आरोप तर नगराध्यक्षा म्हणताहेत.....


Pandharpur Live- 
               कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे, या काळात कुणीही राजकारण करु नये तर सर्व लोकप्रतिनिधींनी कोरोनाचा लढा एकोप्याने लढा! असा सल्ला वरीष्ठ राजकीय नेत्यांकडून दिला गेलेला आहे; परंतु पंढरीत मात्र लॉकडाऊनच्या काळात राजकारण चांगलेच रंगल्याचे दिसुन येत आहे. काल आमदार भारत भालके यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या कार्यावर प्रश्‍न निर्माण करुन नगरपालिका विकली गेली असल्याचा गंभीर आरोप करुन वादाला तोंड फोडले होते; आमदार भालके लॉकडाऊनच्या काळात गेले 50 दिवस गायब होते परंतु काल अचानक प्रसिध्दीमाध्यमांसमोर येवुन ते व्यक्त झाले, इतके दिवस लोकप्रतिनिधी कुठे होते? असा सवाल उपस्थित करत , आमदार भारत भालके हे गेल्या 50  दिवसापासुनची आपली निष्क्रीयता झाकण्यासाठीच आमच्यावर जाणीवपुर्वक टीका करत असल्याचा आरोप नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाकडून प्रसिध्दीस दिलेल्या एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे आमदार भालके यांच्यावर केला आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

नेमकं काय आहे नगरपरिषदेने जारी केलेले प्रसिध्दीपत्रक?
 केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यापासून पंढरपूर नगरपालिका नागरिकांच्या  सुरक्षेसाठी अहोरात्र झटत असल्यामुळेच आज शहर कोरोनामुक्त  असल्याचे चित्र आहे. मात्र चांगल्या कामाचे कौतुक करायसाठी मोठं मन लागत ते जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी यांच्याकडे नसल्यामुळेच ते नगरपालिका विकली गेली आहे... असा गंभीर आरोप करीत आहेत. वास्तविक कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात राजकारण करू नका असे मुख्यमंत्री वारंवार आवाहन करीत असताना लोकप्रतिनिधी मात्र जाणीवपूर्वक टीका करून आपली पन्नास दिवसापासूनची निष्क्रीयता झाकत आहेत. 

नगरपरिषदेचा कारभार प्रथम पासून पारदर्शक व लोकाभिमुख  असल्यानेच जनतेने आम्हाला लोकशाही मार्गाने सत्तेवर बसविले आहे. मात्र तीनवेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जनतेचा हा विश्‍वास जिंकता आला नसल्याची सतत सल टोचते. यामुळेच कोरोना सारख्या मोठ्या संकटात मतभेद, राजकारण बाजुला ठेवून प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित असताना लोकप्रतिनिधी बिनबुडाचे आरोप करीत आहेत. याव्दारे सर्वसामान्य जनतेच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यापासूनच नगरपालिकेने महसूल, आरोग्य व पोलीस विभाग यांच्या मदतीने शहरात विविध उपाययोजना राबविल्या आहेत. दोनवेळा शहर निजुरतीकरण केले असून प्रत्येक दुकानाची फवारणी केली आहे. एक लाख  लोकसंख्या असणार्‍या शहरातील 97 हजार नागरिकांची स्क्रिनिंग तपासणी पूर्ण झाली आहे. तसेच राज्यात सर्वात प्रथम ऑि3समीटर तपासणी पंढरपूर नगरपालिकेने सुरू केली आहे. तर आशा वर्कस, नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या मदतीने प्रत्येक घरात जावून परगावच्या लोकांची यादी करण्यात आली आहे. परजिल्ह्यातील व परराज्यातील अंदाजे 3000 कामगारांच्या राहण्याची सोय केली. सध्या शहरात दाखल होणार्‍या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवु तपासणी करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनेमुळेच आज शहर कोरोनामक्त आहे. याचे साधे कौतुक देखील लोकप्रतिनिधी करू शकत नाही हे जनतेचे दुर्दैव आहे.

अगदी सुरूवातीपासून नागरिकांनी शहरात गर्दी करू नये यासाठी नगरपालिकेने नियोजन करून प्रत्येक गल्ली बोळात दूध व भाजी विक्रीसाठी सोय केली. यासाठी दिडशे विक्रेत्यांना नगरपालिकेने पास वाटप केले आहेत. तसेच आमदार प्रशांत परिचारक यांनी नगरसेवकांची बैठक घेवून प्रत्येक प्रभागात कार्यकत्यारची समिती स्थापून त्या व्दारे वृध्द, गरीब यांची विविध कामे मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या आजी माजी नगरसेवकांची बैठक घेवून प्रभागातील गरजू, गरीब यांना धान्य व भाजी वाटप करण्याची सूचना केली. या अंतर्गत दहा हजारहून अधिक कुटुंबांच्या घरात चुल पेटली. कोरोना विषाणुच्या काळात रेाचा तुटवडा पडल्याने आमदार प्रशांत परिचारक यांच्या आवाहनानंतर अनेक तरूण मंडळांनी रक्तदान शिबीर आयोजित केले. यासर्व घडामोडींमध्ये आपण कोठेच नव्हता.

दरम्यान सरकारने तिसर्‍या लॉकडाऊन काळात दुकाने सुरू करण्यास थोडीफार शिथिलता दिली होती. याचे नियोजन करण्यासाठी व्यापारी व त्यांच्या प्रतिनिधींची नगरपालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्व व्यापार्‍यांनी एकमुखाने दि.17 मे पयरत शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यास नगरपालिकेने मान्यता दिली.

तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमा प्रमाणे शहरात सध्या ए,बी,सी,डी असे दुकानांचे वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये वशिलेबाजी झाली हे त्यांनी सिध्द करून दाखवावे. शहरातील व्यापार पेठ देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेवून जात असल्याचा त्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. पोलीस प्रशासनाच्या सूचने वरूनच शेती माल व धान्याची वाहने आल्यावर ती निजुरतीकरण करण्यासाठी बाजार समितीमध्ये उभी केली जातात. गर्दी टाळण्यासाठी बाजार समितीमध्ये वाहने आणली जात असून यामध्ये देखील लोकप्रतिनिधींना राजकारण दिसत आहे.

अधिकारी, आजी माजी नगरसेवक व आमदार प्रशांत परिचारक यांच्या नियोजनामुळे आज शहर कोरोनामुक्त असून यास नागरिकांनी तेवढीच साथ दिली आहे. पंढरीचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून येथील नियोजनाचे अनुकरण इतर तालुक्याने सुरू केले आहे. वास्तविक लोकप्रतिनिधीने रस्त्यावर उतरून  शासनाला सोबत घेवुन संकटावर मात करणे अपेक्षित आहे. मात्र लोकप्रतिनिधी बिनबुडाचे आरोप करून अधिकार्‍यांचे खच्चीकरण करीत आहेत. संपूर्ण लॉकडाऊन काळात हे लोकप्रतिनिधी गायब असल्यानेच आपली निष्क्रीयता झाकण्यासाठी बेछूट आरोप करीत आहेत. असे प्रसिध्दीपत्रक पंढरपूर नगरपरिषदेने जारी केले आहे.