‘स्वेरी’ ने दिले पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार बांधवांना अन्नधान्यांचे कीट - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 15 May 2020

‘स्वेरी’ ने दिले पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार बांधवांना अन्नधान्यांचे कीट


पंढरपूर (प्रतिनिधी):- 
. पंढरपूर :-पत्रकार संरक्षण समिती, पंढरपूरच्या पत्रकार बांधवांना स्वेरी कॉलेज गोपाळपूर याचे वतीने जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्यांच्या कीटचे वाटप करण्यात आले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीता गणली जाते, आज गल्ली पासून दिल्ली पर्यंत आणि देशा पासून परदेशा पर्यंत म्हणजेच जागतीक माहितीचे संकलन करून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम हे आपले पत्रकार बंधू करत असतात. आपल्याला प्रत्येक गोष्ट आणि घटना घरात  बसून ऐकायला आणि पहायला मिळते. यामधून आपणास आनंद मिळतो.दुःख मिळते तर कधी आपण अचंबित होतो.पण या बातम्या आपल्यापर्यंत पोहचतात कशा यासाठी पत्रकार बांधवांना काय..करावं लागत असेल.  सध्या कोरोनाच्या (कोरोना व्हायरस -कोव्हीड-19) संकटामुळं सर्वांनाच आपापल्या घरात बसुन रहावे लागत आहे; परंतु पत्रकार बांधव मात्र मिनिटा मिनिटाच्या ताज्या घडामोडी आपल्यापयरंत पोहचविण्यासाठी कार्यरत आहेत. सद्यस्थितीत मात्र अनेक पत्रकारांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभुमीवर स्वेरी नं पत्रकारांना दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे.    
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART

पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी आपल्या संघटनेतील पत्रकार बांधवांना लॉकडाऊन काळात विविध मार्गांनी मदत मिळवुन शक्य तेवढा दिलासा देण्याचं कार्य सुरु केले आहे. याआधीही पत्रकार बांधवांना किराणा माल व अत्यावश्यक वस्तुंचे वाटप पत्रकार संरक्षण समितीने केले आहे. 

पत्रकार संरक्षण समिती, पंढरपूरचे चे अध्यक्ष श्रीकांत कसबे यांनी स्वेरीचे प्रा. एम.एम. पवार सर यांचेकडे पाठपुरावा केला होता, त्यानुसार पवार सरांनी विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर या शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी परिवारातर्फे  पत्रकार संरक्षण समिती च्या कार्यालयात किराणा मालाचे कीट पोहोच केले. 

 पत्रकार संरक्षण समितीच्या पंढरपूर येथील पत्रकारांना पुढील टप्प्यात आणखी सहकार्य करण्यासाठी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, पंढरपूर कार्याध्यक्ष झाकीर नदाफ,  अध्यक्ष श्रीकांत कसबे, उपाध्यक्ष तानाजी जाधव, खजिनदार अशोक पवार, प्रसिद्धीप्रमुख संजय हेगडे, सचिव लखन साळुंखे सदस्य  विरेंद्रसिंह उत्पात, डॉ. राजेश फडे, जैनुद्दीन मुलाणी, संतोष कांबळे, शंकर पवार, शंकर कदम, लक्ष्मण जाधव, धीरज साळुंखे, उमेश टोमके, गौतम जाधव, नंदकुमार देशपांडे, अशोक पवार, लखन साळुंखे, तानाजी सुतकर आणि डॉ. शिवाजी पाटोळे, डॉ. संजय रणदिवे, प्रकाश इंगोले,  शरद कारटकर, सचिन दळवे, नामदेव लकडे, आनंद भोसले आदी पत्रकार बांधव प्रयत्न करत आहेत.

add