जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा प्रमुखांची निवड - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 3 May 2020

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा प्रमुखांची निवड


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीतील 335 वा पालखी सोहळ्यातील तीन विश्वस्तांची पालखी सोहळा प्रमुखपदी निवड श्री संत तुकाराम महाराज संस्थानने शनिवारी (दि. 2) जाहीर केली. 

महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या सोहळ्याबाबत करोनाच्या वाढत्या संसर्ग प्रादुर्भावामुळे शासकीय पातळीवर अद्याप कोणतेही नियोजन झालेले नाही. त्यामुळे परंपरा खंडित न करता शासनाच्या नियम, अटी, शर्यतीला अनुसरून सोहळ्याचे नियोजन करणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांनी माहिती दिली आहे.

संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारीतील 335 हा पालखी सोहळा 12 जून रोजी प्रस्थान ठेवणार आहे.

add