पंढरपूर सिंहगडच्या वतीने सी प्रोग्रामिंग भाषा या विषयावर ऑनलाइन क्विजचे आयोजन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Monday, 25 May 2020

पंढरपूर सिंहगडच्या वतीने सी प्रोग्रामिंग भाषा या विषयावर ऑनलाइन क्विजचे आयोजन


Pandharpur Live -  पंढरपूर (प्रतिनिधी)-  कोर्टी (ता. पंढरपूर ): येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालय हे अल्पावधीतच अभियांत्रिकी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या पसंती असलेले गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारे इंजिनिअरींग काॅलेज म्हणून नावलौकिक मिळविला आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाइन सी- प्रोग्रामिंग या विषयांवर क्विज चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.  

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या वतीने दि. २२ मे ते २५ मे २०२० या कलावधीत सी प्रोग्रामिंग भाषा या विषयांवर ऑनलाइन क्विज ही स्पर्धा होणार आहे.  या स्पर्धेला विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग यांच्या कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या कालावधीत इछूक उमेदवारांनी https://forms.gle/g93NsFXPRckW4Wdt8 या संकेतस्थळावर जाऊन सी-प्रोग्राममिंग क्विजचा लाभ घ्यावा. क्विज प्रतिनिधी म्हणून प्रा. गणेश लिंगे हे काम पाहत आहेत तर विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे यांचे मार्गदर्शन सहभागी स्पर्धेकांना होणार आहे.
                   सी ही एक संगणक प्रोग्रामिंग भाषा आहे आणि ही सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी प्रोग्रामिंग भाषा आहे. प्रत्येक अभियांत्रिकी विद्यार्थ्याकडे अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज सी हा विषय असतो. हे विद्यार्थ्याला कोडिंगबद्दलची आवड समजून घेण्यास मदत करते आणि जर एखाद्याला रस मिळाला तर सीएसई नसलेली शाखा असूनही सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये त्यांना काम करता येऊ शकते.
                  जर आपण सीएसई शाखेत असाल तर आपल्या कोडींग कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला ते स्वारस्यपूर्ण आणि फायदेशीर ठरेल.
आजच्या जगात, संगणक प्रोग्रामरला विविध देशांमधील सहकार्यांसह संवाद साधण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. म्हणून ते महत्वाचे आहे की जरी त्यांनी समान शाब्दिक भाषा बोलत नाही तरीही संगणकाची भाषा सर्वांनाच समजण्यासारखी आहे. विद्यार्थ्यांचे विकासात्मक दृष्टीकोन लक्षात घेऊन पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने  ऑनलाईन ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितले.

Ad