सोलापूर, दि.18:- परराज्यातील 117 नागरिकांना आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एसटी महामंडळ तसेच जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या लगतच्या सीमा तपासणी नाक्यापर्यंत पोहोच करण्यात आले. या नागरिकांची पाण्याची व जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अॅन्ड्रॉईड अॅप-
DVP MART
परिवहन अधिकारी अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांच्या निरीक्षणाखाली उत्तर प्रदेश व बिहार येथील येथील प्रवाशांना पाणी, जेवण व बसची व्यवस्था करुन देण्यात देण्यात सोय करुन देण्यात आली.
सोलापूर शहर व परिसरातील काल इतर राज्यातील एकूण 166 नागरिकांना एसटी बसच्या माध्यमातून राज्याच्या सीमा नाक्यापर्यंत सोडण्यात आले. आज पुन्हा 117 नागरिकांना सोडण्यात आले. यामध्ये मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, विजापूर येथील नागरिकांचा समावेश आहे. या प्रवाशांना महाराष्ट्र राज्याच्या लगतच्या सीमा तपासणी नाक्या पर्यंत पाठविण्यात आले. या सर्व प्रवाशांची जेवणाची व पाण्याची सोय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, तसेच एस टी महामंडळाचे महामंडळाचे व्यवस्थापक आदींनी यासाठीचे नियोजन केले. सोलापूर शहर व जिल्ह्यात अडकून पडलेल्या मजुरांना परराज्यात पाठवण्याची सोय केली जात आहे. यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नाव नोंदणी करुन घेऊन त्यांना एसटी बस तसेच रेल्वेने त्यांच्या मूळ गावी सोडण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून परजिल्ह्यात व इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांची नाव नोंदणी करून घेण्यात येत आहे. त्यानंतर त्यांची व्यवस्था केली जात आहे.