सोलापूर-परराज्यातील 132 नागरिक 22 एसटी बसने रवाना - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 21 May 2020

सोलापूर-परराज्यातील 132 नागरिक 22 एसटी बसने रवाना


पंढरपूर लाईव्ह - 
            सोलापूर, दि.21- परराज्यातील 132 नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एसटी महामंडळ तसेच जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या लगतच्या सीमा तपासणी नाक्यापर्यंत 22 एसटी बसने पोहोच करण्यात आले.
          
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्या निरीक्षणाखाली छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, बिहार येथील प्रवाशांना पाणी, जेवण व बसची व्यवस्था करण्यात आली. टाळेबंदीमुळे सोलापूर शहर व जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या मूळ गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. एसटी बस तसेच रेल्वेने नागरिक त्यांच्या राज्याला रवाना होत आहेत.
          दोन दिवसात सोलापूर शहर व परिसरातील इतर राज्यातील एकूण 132 नागरिकांना 22 एसटी बसच्या माध्यमातून राज्याच्या सीमा नाक्यापर्यंत सोडण्यात आले. यामध्ये मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान, उत्तरप्रदेश येथील नागरिकांचा समावेश आहे.
          उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, एस टी महामंडळाचे व्यवस्थापक आदींनी यासाठीचे नियोजन केले. यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नाव नोंदणी करुन घेऊन त्यांना एसटी बस तसेच रेल्वेने त्यांच्या मूळ गावी सोडण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून परजिल्ह्यात व इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांची नाव नोंदणी करून घेण्यात येत आहे. त्यानंतर त्यांची व्यवस्था केली जात आहे. परराज्यातील नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

add