सोलापूर जिल्ह्यातील 771 औद्योगिक घटकांना प्रकल्प सुरू करण्याची परवानगी            सोलापूर, दि. 18- जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडून जिल्ह्यातील 771 औद्योगिक प्रकल्प सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART


            औद्योगिक आस्थापनांनी लॉकडाउन कालावधीत औद्योगिक घटक सुरू करण्याकरिता शासनाच्या permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करावा. त्यानुसार चौकशी करून प्रकल्प सुरू करण्याची परवानगी औद्योगिक प्रकल्पांना दिली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 340 औद्योगिक प्रकल्प सुरू झाले आहेत. या प्रकल्पात सात हजार 296 कामगार काम करत आहेत. औद्योगिक प्रकल्पांच्या पाच वाहनांना  येण्या-जाण्यासाठी पासेस देण्यात आलेले आहेत.            सुरू झालेल्या या औद्योगिक प्रकल्पांमध्ये जीवनाआवश्यक वस्तू , सॅनिटायझर, मास्क निर्मिती, रासायनिक खते, बी बियाणे उत्पादन, औषधी निर्मिती व इंजिनिअरिंग वस्तू आदी उत्पादनांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.