सोलापूर जिल्ह्यातुन आपल्या मुळ गावी जायचंय? जाणुन घ्या महत्वाची माहिती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 7 May 2020

सोलापूर जिल्ह्यातुन आपल्या मुळ गावी जायचंय? जाणुन घ्या महत्वाची माहिती

सोलापूर दि. 7 :  अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) ज्या व्यक्ती सोलापुरात नोकरीच्या निमित्ताने अथवा शिक्षणासाठी इतर जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या मूळच्या जिल्ह्यात जाण्यास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, सोलापूर     यांच्यामार्फत मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती  प्रकल्प अधिकारी, जागृती कुमरे यांनी दिली आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


संबंधित व्यक्तींनी पुढील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा - जागृती कुमरे, प्रकल्प अधिकारी (9420589226), पल्लवी शेळके, सहा. प्रकल्प अधिकारी (9420488882) आणि महादेव बनसोडे, प्रभारी सहा. प्रकल्प अधिकारी (8087706103) किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, प्लॉट नंबर -2 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, आर्किटेक्चर कॉलेज जवळ, कुमठा नाका परिसर, सोलापूर दूरध्वनी क्रमांक 0217-260600, येथे संपर्क साधावा.   

add