आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची दैदिप्यमान परंपरा अखंडीत सुरुच राहणार... शासनाने नियम अटी घालुन पालखी सोहळ्यास परवानगी द्यावी... वारकरी सांप्रदायाची मागणी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 6 May 2020

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची दैदिप्यमान परंपरा अखंडीत सुरुच राहणार... शासनाने नियम अटी घालुन पालखी सोहळ्यास परवानगी द्यावी... वारकरी सांप्रदायाची मागणी


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध सांप्रदायीक कार्यक्रम रद्द करुन घरात बसुनच देवाची भक्ती करा,  असा सल्ला राज्य शासनाकडून देण्यात येत आहे परंतु; आता ‘‘राज्य सरकारने आषाढी वारीच्या नियोजनाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.’’ अशी मागणी वारकरी सांप्रदायाकडून होत आहे. यासंदर्भात आज संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा निघण्याबाबत मानकरी, विश्वस्त आणि इतर महत्वाच्या 9 जणांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या कॉन्फरन्समध्ये  पालखी सोहळ्याची परंपरा न मोडता आषाढी वारीची पायी वारीची परंपरा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यामध्ये  शासनाने सुचवलेल्या पद्धतीने पालखी सोहळ्याचं स्वरूप ठेवण्यावर एकमत झालं आहे. दरवर्षी महाराष्ट्राभरातून साधारणपणे 15 लाख वारकरी मजल-दरमजल करत पंढरपूरमध्ये पोहोचतात. पण यावर्षी  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पाहता पालखी सोहळ्याला इतकं भव्य दिव्य स्वरुप असू शकणार नाही; परंतु पायी वारीची परंपरा अखंडीतपणे सुरु ठेवायला हवी अशी भावना यावेळी व्यक्त झाली.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

यंदा कोरोनाचे जीवघेणे संकट असल्याने पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत शासनाने यावर स्पष्टता द्यावी, अशी मागणी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वंशपरंपरागत महाराज मंडळींनी केली आहे.आषाढी यात्रेच्या पालखी सोहळ्याला अनेक वर्षाची दैदिप्यमान परंपरा आहे, ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, कोरोनाचे सावट असले तरीही सरकारने कांही नियम अटी घालुन दिल्या तर त्यानुसार नियमांचे पालन करुन पालखी सोहळा काढु. असे मत पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी तथा राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेचे ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी व्यक्त केले.


तर देहूचे पालखी सोहळा उत्सव प्रमुख अभिजीत मोरे हे म्हणाले की, दरवर्षी प्रस्थान सोहळ्यात देहूमधून 330 दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. पण यावर्षीच्या संकटांची सगळ्यांना कल्पना आहे. आमच्याकडे काही दिंड्या कर कर्नाटकमधूनही येतात. अशा दिंडी प्रमुखांचे आम्हाला सातत्याने फोन येत आहेत. त्यांच्यकडून सात्यत्याने विचारणा होते आहे की आम्ही काय करायचं. पण आता शासनाच्या निर्णयावर सगळं अवलंबून आहे.

दरम्यान संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक वारकरी सहभाग घेत असतात. तर या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान करतात. मात्र पुण्यातचं कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने हा पालखी सोहळा कसा पार पडणार यावर आता शंका निर्माण केली जात आहे. या दोन्ही पालख्या पुण्यात जिथे मुक्कामी असतात. तिथेच कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. त्यामुळे पालखीचं स्वरुप कसं असावं यावर विचार होणं गरजेचं असल्याचं वारकर्‍यांचं म्हणणं आहे.

add