सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 4777 नागरिकांना परवानगी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 21 May 2020

सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 4777 नागरिकांना परवानगी

 पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन - 

        सोलापूर दि. 21 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 364  नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 4413 नागरिकांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी 4777  नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.
          राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जानुसार परवानगी देण्यात येत आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

एक मे 2020 पासून covid19.mhpolice.in या वेबसाईट आजपर्यंत 69873 अर्ज प्राप्त  झाले असून 28575 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 3899 अर्जांना परवानगी नाकारली असून 15975 अर्ज प्रलंबित आहेत. नाकारण्यात आलेले बहुतांशी अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे नाकारले आहेत. तर काही अर्ज इतर जिल्ह्यातून/राज्यातून मान्यता मिळाली नसल्याने  प्रलंबित आहेत. वैद्यकीय कारणाबाबतचे अर्ज तात्काळ समन्वय साधून परवानगी दिली जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 21424 अर्जांना परवानगी  दिली  गेली  होती  पण  त्यांची मुदत संपल्याचे  जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एकूण  32780 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी  25615 जणांना परवानगी दिली आहे तर 7165 जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.
विदेशातील 21 जणांचा समावेश
                          वंदेभारत मिशन अंतर्गत  11 मे पासून आजपर्यंत विदेशातून एकूण 21 नागरिक         सोलापुरात परतले आहेत.  मुळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले  नागरिक कोरोना आणि लॉकडाऊनमुळे परराष्ट्रात अडकले होते. वंदे भारत मिशन अंतर्गत शासनाकडून या नागरिकांना मायदेशी परतण्याची व्यवस्था करण्यात आली. सोलापुरात परतलेले नागरिक इनस्टिट्युशन क्वारंटाईन मध्ये आहेत.

add