पंढरीत लॉकडाऊन काळात उघडलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 14 May 2020

पंढरीत लॉकडाऊन काळात उघडलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई


पंढरपूर लाईव्ह-
पंढरपूर शहरातील काही व्यापा-यांनी लॉकडाऊन काळात दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी कमेटी मिटींग मध्ये झालेला असतानाही काही व्यापार्‍यांनी आपली दुकाने आज उघडी ठेवली असल्याचे उघडकीस झाल्याने अशा व्यापा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


ही दुकान उघडे  ठेवायची किंवा नाही याबाबत बैठक झाली होती,  या बैठकीमध्ये सर्वांनुमते 17 मे पर्यन्त लॉक डाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आज शहरातील काही कापड व्यापारी यांनी दुकाने उघडल्याची तक्रार  नगरपरिषदेकडे आली होती.

 त्यावर नगरपरिषद ची टीम त्याठिकाणी पोहोचली, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर  उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांचे  मार्गदर्शनाखाली नगररचनाकार अतुल केंद्रे, लिपिक चिदांनंद सर्वगोड, चेतन चव्हाण,नवनाथ पवार यांनी जितेंद्र नंदकिशोर मर्दा, गोपाळ बाबुराव गाडे, अनूप जवाहर दोशी, राजेश कपडेकर यांचेवर  प्रत्येकी  रु 5000 ची दंडात्मक कारवाई केली आहे.

व्यापा-यांनीच बंद चा घेतलेला निर्णय काही व्या-यांनीच न पाळल्याने आता नियमभंग केलेल्या संबंधित
व्या-यांवर दंडात्मक कारवाई नंतर पोलिसांकडून गुन्हे दाखल करून दुसरी कोणती कारवाई होणार का? याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे. 

add