कोरोनाच्या संकटात मुंबई, पुणे येथे बीड जिल्ह्यातील हजारो परिचारिका यांची अविरतपणे रूग्णसेवा ; भक्तराम फड यांची माहिती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 4 May 2020

कोरोनाच्या संकटात मुंबई, पुणे येथे बीड जिल्ह्यातील हजारो परिचारिका यांची अविरतपणे रूग्णसेवा ; भक्तराम फड यांची माहिती


बीड (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये रेड झोन निर्माण केले आहे. कोरोना विषाणूच्या महाभयंकर संकटात बीड जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने परिचारिका व कर्मचारी दिवस-रात्र करत असलेले अविरतपणे. रूग्णसेवेचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्या देशावर ओढावलेल्या कोरोनारुपी संकटाचा सामना करण्यासाठी बीड जिल्ह्यातील हजारो.परिचारिका यांनी खारीचा वाटा या भावनेने आपले योगदान देत असल्याचे परिचारिका संघटनेचे भक्तराम फड यांनी सांगितले. 
                देशासह संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या महाभयंकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स, पोलीस व सफाई कामगार दिवस-रात्र मेहनत घेत असताना बीड जिल्ह्यातील मुंबई व पुणे सारख्या शहरामध्ये अशा कठीण परिस्थितीत महत्त्वाचे योगदान देत आहेत. अशा जागतिक महामारी मध्ये आम्ही जनतेसाठी रूग्ण सेवा देत आहोत, जनतेने मात्र स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन कर्मचारी करताना दिसत आहेत.कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिचारिका यांचे महत्त्वाचे योगदान देताना दिसत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील प्रशासनाने उत्कृष्टपणे नियोजन केल्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले आहे. कोरोनाच्या संकटात बीड जिल्यातील हजारो परिचारिका पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कोरोणासाठी लढत आहेत. बीड जिल्यामध्ये पालकमंत्री चागल्या प्रकारे काम करत आहे त्यामुळे आम्हाला गावाकडे काळजी करण्याच कारण नाही. अशी माहिती परिचारिका संघटनेचे  भक्तराम फड यांनी दिली आहे. त्यांनी परिचारिका म्हणुन शेवटच्चा क्षणापर्यंत काम करु असे सांगण्यात आले. पुणे येथे बीड जिल्ह्यातील परिचारिकांची हाँटेल, मेस बंद पडल्यामुळे भोजनाची व्यवस्था होत नव्हती त्यांच्या उपासमारीची संकट ओढवले होते. ही माहिती कळातच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी महिनाभर पुरेल ऐवढे किराणा सामनाची किट दिली आहे. त्यामुळे संकटात पालकमंत्री मदतीला धावल्यामुळे परिचारिकांना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री यांचे सर्वांनी आभार मानले आहेत. 
      जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गमुळे चिंताग्रस्त आहेत. संपूर्ण देशात लाँकडाऊन व संचारबंदी आहे. लाँकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. कोरोना या जिवघेण्या संकटात व लॉकडाऊन काळात दररोज परिचारिका रूग्ण सेवा देत आहेत. रूग्णांना तत्पर व आपुलकीने आरोग्य सेवा दिली.त्याबद्दल रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी धन्यवाद देवून सर्वांचे आभार मानले. आहेत. परिचारिकांच्या योगदानाचे सर्वञ कौतूक होत आहे.त्यामुळे हे देवदुताची भुमीका बजावत आहेत. रूग्णांची सेवा हे तर आमचे कर्तव्यच आहे.तसेच रूग्ण हा आमच्यासाठी ईश्वर ही आहे.कोरोना या संकटामुळे लोक घाबरले आहेत.मग,अशावेळी आम्ही नाही.तर कोण येणार मदतीला रूग्णसेवा आमचे कर्तव्य असल्याचे भक्तराम फड तसेच  लक्ष्मण गाढवे .सुरज गालफाडे .सिध्देश्वर मुसळे .प्रितम साखरे. ज्ञानेश्वर तांदळे. बालाजी केंन्दे निवृत्ती चाटे मुंबई येथे
संतोष.मुंडे विकास डोईफोडे आदींनी सांगितले.

add