रमजान महिन्याचे औचित्य साधुन मुस्लिम बांधवांना फलाहाराचे वाटप...राजवीर राजलक्ष्मी सामाजिक संस्था व शिवसेनेचा अभिनव उपक्रम


पंढरपूर (प्रतिनिधी):- सध्या रमजान महिना सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊन असल्यामुळे  सर्व व्यवहार ठप्प आहेत. सर्व सण, उत्सवास  बंदी आहे. या काळात आपल्या घरी राहुन सर्वांनी कोरोनापासुन आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करणं अतिमहत्वाचं आहे. त्याचप्रमाणे गरजवंतांना मदतीचा हात देणंही अत्यावश्यक आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना चालु आहे. या काळात राजवीर राजलक्ष्मी सामाजिक संस्था व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने  कालिका देवी चौक परिसरातील मुस्लिम  बांधवाच्या घरोघरी जाऊन फलाहाराचे वाटप करण्यात आले.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


   राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय समाजसेवी चॅरिटेबल संस्था पंढरपूर आणि शिवसेनेच्या वतीने ‘एक हात मदतीचा’  यानुसार विविध समाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंढरपूरचे  प्रांताधिकारी सचिन ढोले  यांच्या सल्ल्यानुसार जिथं गरज पडेल तिथं शक्य ते मदतकार्य आम्ही करत आहोत. याचाच एक भाग म्हणुन पवित्र अशा रमजान महिन्यात मुस्लिम समाजबांधवांना फलाहार वाटप करण्यात आल्याची माहिती राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख  ओंकार  बसवंती, राजलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सचिव तथा शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख सौ.आरतीताई ओंकार बसवंती यांनी दिली.

   

यावेळी सौ. अमृताताई वेदपाठक. युवराज गोमीवाडेकर मेंबर, शिवसैनिक देविदास धट. सचिन खंकाळ, प्रकाश लोखंडे मेंबर,  मुजावर भाई आणि हिंदू मुस्लिम बांधव  आदींचे सहकार्य लाभले.