पंढरीतील समता नगर येथे रक्तदान शिबीर संपन्न

Pandharpur Live - 
            समता नगर पंढरपूर येथील कवयत्री व समाजसेविका रत्नप्रभा पाटील यांनी त्यांच्या सासुबाई  दिवंगत सोनाबाई अर्जुन पाटील यांचे स्मरणार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरास उत्तम प्रतिसाद लाभला. 

         सरजुबाई बजाज रक्तपेढी, पंढरपूर व अ‍ॅटी कोरोना टास्क फोर्स च्या भारती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर असल्याची माहिती यावेळी टास्क फोर्सच्या पंढरपूर समन्वयक रत्नप्रभा पाटील यांनी दिली.

         पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पुजन करुन शिबीराचे उद्घाटन झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात सध्या  रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे सर्व जनतेने रक्तदान करावे असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले. न.पा. चे मुख्य आरोग्याधिकारी डॉ. धोत्रे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

सदर शिबीर यशस्वी होणेसाठी टास्क फोर्सचे प्रशांत काकडे, अजित माने, शेखर भोसले, संजय पाटनकर, अपराजित सर्वगोड, नितीन शिंदे, वल्लभ पाटील यांनी विशेष परिश्रम गेतले. 

या शिबीरास पंढरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.पवार यांनीही भेट दिली. यावेळी सी.ए. पाटील, तेजश्री वाठारकर, सिध्दाप्पा भीमाशंकर, रत्नप्रभा पाटील, सचिन शिंदे, यशवंत कुंभार, एम.एच. देवकर, डॉ. संभाजी भोसले आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

सरजुबाई बजाज रक्तपेढीचे डॉ. एस.एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने रक्तदान शिबीर पार पाडले.