लॉकडॉऊन काळात शहरातील सामाजिक संघटनांनी केलेल्या मदतीबद्दल आभार-नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 23 May 2020

लॉकडॉऊन काळात शहरातील सामाजिक संघटनांनी केलेल्या मदतीबद्दल आभार-नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले


Pandharpur Live ll- 
पंढरपूर नगरपरिषद पंढरपुर अंतर्गत दिनदयाळ अंत्योंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान या योजनेमधुन CPWD गोपाळपुर रोड येथे शहरामधील निराश्रित लोंकासाठी माऊली बेघर निवारा सुरू केलेला आहे सदर निवा-या मध्ये असणा-या लाभार्थीसाठी कॉट,गादी,बेडशीट,चादरी व स्वच्छतागृह उपलब्ध करून देणेत आलेले आहे.
      


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

निवा-यातील लाभार्थीना वेळेवर चहा,नाष्टा व दोन वेळचे जेवण देणेत येत आहे दि. २२-०३-२०२० पासुन कोव्हिड १९ या  साथरोगामुळे लॉकडॉऊन मध्ये जवळपास १७७ लोक सदर ठिकाणी वास्तव करित होते. त्या कालावधी मध्ये माऊली बेघर निवारा मध्ये दि २२-०३-२०२० ते आजपर्यंत  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती व इस्कॉन मंदिर यांनी सकाळी नाष्टा आणि कोळी महासंघ उपाध्यक्ष अरूणभाऊ कोळी यांनी रोज संध्याकाळी एक वेळचे जेवण सर्व लोकांना पुरवित आहेत.  तसेच नगराध्यक्षा सौ.  साधनताई भोसले, महावीर जयंती निमित्त शहरामधील जैन बांधव, पंढरपुर शहर डॉक्टर्स असोसिएशन, माणुसकी समाजसेवा संस्था,राष्टीय स्वंयसेवक संघ, साईबाबा संस्था, महेश तेंडुलकर, रोटरी क्लब पंढरपुर, संजय शांतीलाल शहा, कोस्तुभ ट्रेडिंग ,कंपनी, सुभाष मर्दा, दिपक चंदनशिवे, शिवाजी कोरे पोलिस निरिक्षक पंढरपूर, डॉक्टर श्रीकांत खटावकर, व संजिव खपाले, शाम पवार, बागवान मुहल्ला,  न्यु बागवान मुहल्ला,अमित गायकवाड कृष्णा चौंडी,योगेश डोंगरे,शिवाजी कोळी,सुजितकुमार सर्वगोड,विठाई बहुऊद्देशिय संस्था इब्राहिम बोहरी,अश्विनी महाराज मनमाडकर, यांचे मार्फत गहु तांदुळ व किराणा साहित्य,भाजीपाला व फळे  देणेत आले आहे
     वरिल सर्व मान्यवर व्यक्तींनी केलेल्या सहकार्याबद्दल नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व  सर्व अधिकारी पदाधिकारी यांचे मार्फत आभार व्यक्त करणेत येत आहे.

add