पूर्ण क्षमतेने सुरू नसलेल्या सोलापूरातील "त्या 12 दवाखान्यांना" नोटीस बजावणार


Pandharpur Live- 
          
सोलापूर, दि.30:- शहरातील बारा हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे तपासणीत आढळल्याने त्यांच्यावर नोटीस बजावण्यात यावी, यासाठी सोलापूर महानगरपालिकेला शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार आणि भरारी पथकाच्या प्रमुख उज्वला सोरटे यांनी दिली.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART
         सोलापूर शहरातील हॉस्पिटल रुग्णसेवा देतात की नाही याची तपासणी करण्यासाठी श्रीमती सोरटे यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त करण्यात आले आहे.  या पथकाने गेल्या दोन दिवसात 17 दवाखान्यांची तपासणी केली त्यापैकी 16 दवाखाने सुरू होते.  पण त्यापैकी पाच दवाखान्यात पूर्ण क्षमतेने सेवा दिली जात असल्याचे तपासणीत आढळले स्पॅन लहान मुलांचा दवाखाना, दंतकाळे हॉस्पिटल, आदर्श हॉस्पिटल, नवनीत हॉस्पिटल आणि चितळे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू होते. असे श्रीमती सोरटे यांनी सांगितले       

        तपासणीत महिला हॉस्पिटल होटगी रोड, देवणी नर्सिंग होम, सिध्देश्वर पेठ, विजापुरे नर्सिंग होम पाच्छा पेठ, राघवेंद्र हॉस्पिटल विजापूर रोड, शोभा हॉस्पिटल, विजापूर रोड, विठाई क्लिनिक सात रस्ता, धांडोरे हॉस्पिटल, विजापूर रोड, राहुल नर्सिंग होम, फॉरेस्ट आदी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे आढळले नाही , असे श्रीमती सोरटे यांनी सांगितले.