पंढरपूरकर आपल्यासाठी महत्वाचे... बाहेरगावाहून आलेल्या सर्वांना 14 दिवस सक्तीने ठेवले जाणार विलगीकरण कक्षात - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Saturday, 30 May 2020

पंढरपूरकर आपल्यासाठी महत्वाचे... बाहेरगावाहून आलेल्या सर्वांना 14 दिवस सक्तीने ठेवले जाणार विलगीकरण कक्षात


Pandharpur Live- 
*पंढरपूर शहरातील नागरिकांना नगरपरिषद प्रशासनाची महत्वाची सूचना* 
शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की ,पंढरपूर शहरामध्ये  मुंबईवरून आलेल्या दोन व्यक्ती कोरोना बाधित  सापडलेल्या आहेत, या पार्श्वभूमीवर  यापुढे पंढरपूर शहरामध्ये  येणाऱ्या सर्व बाहेरगावच्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी 14 दिवस  मठामध्ये ठेवण्यात येणार आहे.

त्यासाठी शक्यतो पंढरपूर शहरातील रहिवासी  नसलेल्या नागरिकांनी पंढरपूर शहरामध्ये येण्याचे टाळावे. तसेच त्या व्यक्तीच्या  नातेवाईकांनी  त्यांना शहरात येण्यास मनाई करावी व शहर कोरोना मुक्त ठेवण्यास व करण्यास मदत करावी. यापुढे ज्या व्यक्ती रेड झोन मधून पंढरपूर मध्ये दाखल होतील त्या सर्वांना सक्तीने 14 दिवस मठा मध्येच ठेवण्यात येणार आहे.  व त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी तरी सर्व पंढरपूरकर यांनी प्रशासनास मदत करावी असे आवाहन पंढरपूर नगरपरिषद चे वतीने नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर  यांनी केले  आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

Ad