पंढरपूर नगरपरिषदेच्या इमारतीत शॉर्टसर्किटमुळे आग ...आणि मोठी हानी टळली ! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 19 May 2020

पंढरपूर नगरपरिषदेच्या इमारतीत शॉर्टसर्किटमुळे आग ...आणि मोठी हानी टळली !


Pandharpur Live- पंढरपूर नगरपरिषदेमध्ये वीजमिटरच्या मेन लाईन जवळ शॉर्ट सर्किट झाले. परंतु उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांचे प्रसंगावधानामुळे व अग्निशामक दलाच्या प्रयत्नांमुळे नागरी सुविधा केंद्र थोडक्यात वाचले.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MARTशॉर्टसर्किट झाल्याची माहिती कळताच अग्निशमन दला चे कर्मचारी यांना पाचारण करण्यात आले स्वतः उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर ,विष्णू  गुमटे, रवी नगरे,शाम अन्नदाते,समाधान काळे ,महाकाल नलवडे ,औदुंबर सुतार  यांनी कर्मचाऱ्यां समवेत आत जाऊन आग विझवली.

 यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले सर्व कर्मचारी यांनीही या ठिकाणी येऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.


मोठा अनर्थ टळला कारण नागरी सुविधा केंद्र येथे करविभाग , बांधकाम परवानगी ,आवक जावक ,जन्म मृत्यू नोंदणी विवाह नोंदणी, व इतर सर्व महत्वाचा डाटा सर्व संगणक होते.

add