विजांच्या कडकडाटासह बरसल्या पाऊसधारा... शेतक-यांवर आस्मानी संकट


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन - काल रात्री सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. उकाड्यामुळे हैरान असलेल्या नागरिकांना या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे फळांना बाजारात दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. अशातच या आस्मानी संकटाने पुन्हा शेतकऱ्यांना मारले आहे. वादळी वारे आणि गारांच्या पावसाने या भागातील शेतकऱ्यांचे कांदा, केळी, डाळिंब, द्राक्षे, पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील माढा, पंढरपूर, करमाळा, बार्शी, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्‍यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस बरसला. 


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


Pandharpur taluka (11.5.2020) rainfall recorded circlewise is as follows. 
Karkamb 2mm
Patkuroli 13mm
Bhandishegaon 7mm
Bhalawani 9mm
Kasegaon 5mm
Pandharpur 6mm
Tungat 3mm
Chale 2mm
Puluj 10mm

Total rainfall 57mm
Average rainfall 6.33mm

पंढरपूर तालुक्‍यातील भाळवणी, जैनवाडी भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने काढणीस आलेली द्राक्षे, आंबा पिकांसह अन्य फळ पिकांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. आज सायंकाळी सहा वाजणेच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले. त्यातच मेघगर्जेनेसह गारांचा पाऊस झाला आहे. सुमारे अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसाने काढणीस आलेल्या फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील जैनवाडी, भाळवणी, गार्डी परिसरात लिंबाच्या आकाराच्या गारांचा पाऊस झाला. गारांच्या तडाख्याने काढणीस आलेले द्राक्षे, आंबे, डाळिंब फळांना तडे गेले आहेत.

रात्रीझालेल्या पावसाने फळबागांचे आणि उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारभाव नसल्याने शेतात पडून असलेला कांदा भिजला आहे. अचानक झालेल्या गारपिटीने काढणीला आलेल्या मूग, उडीद पिकाचेही नुकसान झाले आहे. वादळी पावसाने आंबा पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र सुकत असलेल्या भुईमूग पिकास या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.