17/03/2020 ते दि.03/05/2020 या कालावधीत श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 3 May 2020

17/03/2020 ते दि.03/05/2020 या कालावधीत श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद

Pandharpur Live- कोरोना व्हायरस (कोविड-19) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसंेदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.17/03/2020 ते दि.03/05/2020 या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. 

  तथापि, दि.02/05/2020 रोजी मा. केंद्र शासनाने दि.17/05/2020 पर्यंत संपूर्ण देशभरात लाॅकडाऊन घोशित केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. तसेच आपल्या सोलापूर जिल्हयात देखिल कोरोनारूग्ण आढळून आलेले आहेत. ही बाब विचारात घेता. मंदिरे समितीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.17/05/2020 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे महाराश्ट्रातील व महाराष्ट्रबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधित आहेत. त्यामुळे श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी, हजारो वर्शाचे प्रथा व परंपरांची सांगड घालून करणे आवष्यक आहे. कामातील त्रुटींमुळे भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही यासाठी पुरेपर दक्षता घेणे आवष्यक आहे. तसेच वारकरी सांप्रदयाचे श्रींच्या नित्योपचारंाबरोबर अन्य प्रथा परंपंरा यावर कटाक्षाने लक्ष्य असते ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदनउटी पुजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात येत आहे. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

  सदरचे पत्रक श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे सर्व सदस्य महोदय यांचेषी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

add