‘‘आषाढी वारी आली आहे आणि मी पंढरपुरला जाणार आहे’’ - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ; आषाढी एकादशीची श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची महापुजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सपत्नीक करणार!

Pandharpur Live - 
               कोरोनाचे सावट आल्याने गेल्या अनेक महिन्यांपासुन पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन बंद आहे. यावर्षी आषाढी वारीत सुध्दा कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य वारकरी भाविकासाठी पांडुरंगाचे दरवाजे बंद आहेत. या पार्श्‍वभुमीवर आषाढी एकादशी दिवशी परंपरेनुसार श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापुजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार की नाही? याबाबत गेल्या अनेक दिवसांपासुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. परंतु अखेर स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच ‘‘आपली आषाढी वारीची परंपरा आहे. आषाढी वारी आली आहे आणि मी पंढरपुरला जाणार आहे.’’ असं जाहीर केलं आहे. त्यामुळे आषाढी एकादशीची श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापुजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सपत्नीक करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विठूरायाला कोरोनाचं संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी साकडं घालणार आहे, मुख्यमंत्री या नात्याने नाही, तर तुमचा, वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

                 आपल्या विठू रायाला साकडं घालणार आहे, राज्यात काय परिस्थिती निर्माण झाले आहे. लाखो वारकरी आज घरात अडकले आहे. अनेक चित्रपटातून तुझे चमत्कार आम्ही पाहिले आहे. राज्यावरील कोरोना संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी पाठीशी उभे राहावे. मुख्यमंत्री म्हणून मान वेगळा आहे पण मी मुख्यमंत्री म्हणून नाहीतर तुमचा प्रतिनिधी म्हणून जात आहे.

               राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वधर्मियांना आपले उत्सव घरातच साजरे करावे लागले. त्यांना मोठा संयम दाखवला. यासाठी त्यांचे आभार मानतो. आषाढी एकादशीची वारीही संकटात आली. वारकर्‍यांनी संयम दाखवला, यासाठी त्यांचेही आभार, मात्र मी विठूरायाला साकडे घालायला जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी यावेळी सांगितलं.

                  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी (28 जून) दुपारी दीडच्या सुमारास राज्यातील जनतेशी संवाद साधला. आधी कोरोना, नंतर निसर्ग चक्रीवादळ यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र शासनाने चांगले काम केले, मनुष्यहानी कमी करण्याचे प्रयत्न केले. तसेच राज्यातील अनलॉकबाबत आणि इतर गोष्टींवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाष्य केलं.