आषाढी वारीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये मटण, मासे विक्रीस बंदी


अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी जारी केले आदेश

     सोलापूर, दि. 29 : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरामध्ये  30 जून ते 02 जुलै अखेरपर्यंत मांस, मटण, मासे  विक्री आणि प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी जारी केले.  

          1 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने पंढरपुरात वारीनिमित्त मानाच्या पालख्या आणि वारकरी येतात. सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, शहरातील कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मांस, मटण, मासे विक्री आणि प्राणी कत्तलीवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये बंदी घालण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.