सविस्तर बातमी- पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर अपघात... डोक्यावरुन टिपरचे चाक गेल्याने एकाचा जागीच मृत्यू


Pandharpur Live -
पंढरपूर तहसिल कार्यालयाजवळ आज साडे चार वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील एकाच्या डोक्यावरुन टिपरचे मागचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
खडी घेवून जात असलेल्या भरधाव वेगातील टिपरने दुचाकीवरुन कराड नाक्याकडे जात असलेल्या दोघांना पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातात रामचंद्र मेटकरी (वय 75) (रा. भक्ती मार्ग, पंढरपूर) या दुचाकीवरील व्यक्तीच्या डोक्यावरुन सदर टिपरचे मागचे चाक गेल्याने त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. असुन अपघातग्रस्त दुचाकी व टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातात जखमी झालेल्या कोर्टी, ता. पंढरपूर येथील वृध्द महिलेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृताचे व जखमीचे नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात हजर झाले असुन या अपघातासंदर्भात पुढील कार्यवाही पंढरपूर शहर पोलीस वाहतुक शाखेचे श्री.निंबाळकर हे करत आहेत.