अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्येपूर्वीची धक्कादायक माहिती....सुशांतची माजी मॅनेजर दिशानेही 4 दिवसांपूर्वीच केली होती आत्महत्या! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Sunday, 14 June 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्येपूर्वीची धक्कादायक माहिती....सुशांतची माजी मॅनेजर दिशानेही 4 दिवसांपूर्वीच केली होती आत्महत्या!

Pandharpur Live online -

हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याने त्याच्या चाहत्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. इतक्या लहान वयात त्याने अशा पद्धतीने उचललेल्या पावलांमुळे सर्वजण व्यथित झाले आहेत. त्याच असं जाणं मनाला चटका लावून जाणार आहे. चार दिवसांपूर्वी त्याची माजी व्यवस्थापक दिशा सलियन हिने १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येमध्ये दिशाच्या मृत्यूचाही संदर्भ आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.


'छिछोरे' या सिनेमात सुशांत सिनेमातील आपल्या मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखतो. पण दुर्देव बघा रिअल लाईफमध्ये सुशांत स्वत: ला आत्महत्या करण्यापासून रोखू शकला नाही. सुशांतच्या आत्महत्येमुळे अवघं बॉलिवूड हादरलं आहे. पण दुसरीकडे मात्र सुशांतच्या आत्महत्येमुळे एका आठवड्यापूर्वीच सुशांतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्येचा विषय देखील पुन्हा चर्चेला आला आहे. तसं पहायला गेलं तर सुशांतची पूर्वीची मॅनेजर या पलिकडे दिशाचे नाव सुशांतशी जोडले गेलं नाही. पण दोघांनी एका पाठोपाठ आत्महत्या केल्यानं आता दोघांच्या आत्महत्येत काही कनेक्शन आहे का? या चर्चेनं जोर धरला आहे. पण अतिशय भावनिक आणि करिअरवर फोकस करणारा सुशांत असं पाऊल उचलून कसं शकतो? असं त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

दिशा सालियन हिनं गेल्या सोमवारी (8 जून) मालाड येथील राहत्या घरातून खाली उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर रविवारी (14 जून) दुपारी 12.30 च्या दरम्यान सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. दिशा आत्महत्या प्रकरणी पोलिस दिशाच्या मित्रांची चौकशी करत आहे. मित्रांसोबत झालेल्या पार्टीनंतर दिशाने आत्महत्या केली होती, असं तपासात समोर आलं आहे. तर सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याच्या घरात काम करणारे 4 जण होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


सुशांतने आर्थिक सकंटांमुळे आत्महत्या केली असावी, असंही बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुशांत प्रचंड मानसिक तणावाखाली होता. यामुळे त्याला नैराश्य आलं होतं. सुशांत गेल्या काही दिवसांपासून कोणाच्याच संपर्कात नव्हता. पोलिस आता सुशांतचे बॅंक अकाऊंट आणि आर्थिक व्यवहार तपासत आहेत. तर सुशांतचे फोन रेकॉर्डही तपासले जात आहेत. प्रथम दर्शनी पोलिस तपासात दिशा आणि सुशांत यांच्या आत्महत्येचे काही कनेक्शन समोर येत नाही आहे. पण सुशांत आणि दिशाच्या एका पाठोपाठ आत्महत्येने बॉलिवूडसह सर्वत्रच ठिकाणी विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

एकेकाळी सुशांतने म्हटले होते 'मी स्वतःला कधीच गंभीर घेत नाही'  सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचून पुढील तपास करीत आहेत. अद्याप पोलिसांना सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहलेली सापडली नाही. पण, या दोन मृत्यूंचा एकामेकांशी काही संबध आहे का? याबाबत कोणाकडेही अद्याप कोणतेही उत्तरे नाही. पण, सुशांतची माजी व्यवस्थापकाची आत्महत्या ४ दिवसांपूर्वीच होणं आणि नंतर लगेच सुशांत राजपूत सारख्या प्रतिभावान अभिनेत्याने आत्महत्या करणं यामध्ये काही संकेत दडले आहेत का? अशा चर्चेंनाही सध्या उधाण आले आहे.


सुशांत सिंह राजपूत शेवटच्या पोस्टमध्ये आईला आठवताना म्हणतो..

दिशाच्या मृत्यूनंतर सुशांत व्यथित झाला होता. त्याने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर शोक संदेश लिहिला होता. या संदेशात तो म्हणाला होता की, ' ही एक अतिशय वाईट बातमी आहे, दिशाचे कुटुंबिय आणि मित्रांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तुझ्या आत्म्यास शांती मिळो '.

'जगण्याची व्याख्या फार वेगळी आहे, तुझं असं जाणं पटत नाही'


सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सलियन हिने ८ जून रोजी मालाड येथील आपल्या १४ व्या मजल्यावरील फ्लॅटमधून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यावेळी ती आपला मित्र रोहन रॉयसोबत जेवण करीत होती आणि अचानक तिने उडी मारुन आत्महत्या केली. दिशाने बॉलीवूडमधील अनेक मॅनेजमेंट आणि पब्लिक रिलेशन फर्म सोबत काम केले होते. सध्या ती सजदेहच्या कॉर्नरस्टोन सोबत काम करत होती.


आत्महत्या नाही तर खून! सुशांत सिंह राजपूतच्या मामाचा आरोप, CBI चौकशी करण्याची मागणी


वयाच्या 34 व्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने जगाचा निरोप घेतला. वांद्रे येथील राहत्या घरी त्याने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपासास सुरूवात केली आहे. मात्र या प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सुशांंतचे मामा आरसी सिंह यांनी केली आहे. सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या घरापर्यंत पोहोचताच त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच सरकली. पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रिये दरम्यान सुशांतच्या मामांनी ही अशी मागणी केली आहे की या प्रकरणाची न्यायीक पद्धतीने तसंच सीबीआय चौकशी व्हावी. राजपूत महासभेच्या वतीने त्यांनी ही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

'महाराष्ट्रात एका राष्ट्रवादी तरूणाची हत्या झाली असून असे तरूण आता महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत. सुशांत आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हता', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


सुशांत सिंह राजपूत याला रात्री 2 वाजता त्याच्या घरातील नोकराने शेवटचा ज्यूस दिला होता. त्यानंतर थेट आज दुपारी सुशांतचं जेवण घेऊन नोकर गेला. बराच वेळ आवाज दिल्यानंतरही सुशांतने दार न उघडल्याने त्याने सुशांतच्या मित्रांच्या मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. . भरपूर प्रयत्न करूनही दरवाजा तुटला नाही. अखेर सुशांतच्या मॅनेजरने एका चावीवाल्याला बोलावून घेतलं. त्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. मात्र समोर दिसला तो सुशांतचा मृतदेह. हे दृश्य बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. पोलिसांना फोन करण्यात आला आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर चावीवाल्याचा जबाब नोंदवून घेतला आहे.


सुशांतच्या कॉल डेटाच्या साहाय्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्याने कोणतीच सुसाइड नोट लिहून ठेवली नसल्याने तपास अवघड आहे. त्याच्या कॉल डेटाच्या साहाय्याने पुढील तपास केला जाणार आहे. सध्या हत्या आणि आत्महत्या या दोन्ही शक्यता पडताळून तपास केला जात आहे.


Ad