आषाढी यात्रेच्या तोंडावरच पंढरीत व करकंब मध्ये कोरोना रूग्ण... तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी 'त्या' रूग्णाची तपासणी केलीच नव्हती!


Pandharpur Live - 

ऐन आषाढी वारीच्या तोंडावरच पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावर एक कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याचे समजते. याचबरोबर तालुक्यातील करकंब येथेही एक कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याचे समजते. 

पंढरीत आढळून आलेला रूग्ण हा एका सहकारी बँकेचा संचालक असुन त्याची तपासणी पंढरपूर च्या तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी स्वतः केली होती असे वृत्त काही वेब पोर्टल आणि यु-ट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झाले आहे; परंतु अशा कोणत्याही रूग्णाची तपासणी आपण केलेली नसल्याचा खुलासा तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना केला आहे. काही महिलांची तपासणी आपण केलेली होती परंतु पेशाने शिक्षक असलेल्या व्यक्तीची आरोग्य तपासणी मी केल्याचे वृत्त निराधार असल्याचेही त्या म्हणाल्या.


 पंढरपूरच्या तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी आढळून आलेल्या रूग्णाची तपासणी केली होती का? याबाबत पंढरपूर चे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचेकडून पंढरपूर लाईव्ह ने जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता, सदर रूग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेस करणे चालु असून अद्याप तरी तहसिलदार यांचा कॉन्टॅक्ट या रूग्णाशी आल्याचे आढळून आले नाही. अजुन सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. पुढे तसे काही समजले तर कळविण्यात येईल.  असे मत प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना व्यक्त केले. 


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

पंढरीतील प्रदक्षिणा मार्गावरील बेलीचा महादेव परिसरात वास्तव्य असणाऱ्या एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समजते.

पंढरपूर तालुक्यातील करकंबमधील एका रुग्णाचा अहवालही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले असून ठाणे येथून आलेल्या या व्यक्तीला सध्या mit कोरोना केअर सेंटर येथे दाखल केले आहे.

पंढरीतील प्रदक्षिणा मार्गावर रूग्ण आढळून आल्याने सदर रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आल्याचे समजते.