चिंताजनक- पंढरीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला... 7 नव्या रूग्णांची भर


पंढरपूर लाईव्ह- आषाढी वारीच्या तोंडावरच कोरोनामुक्त असलेल्या पंढरी नगरीच्या प्रदक्षिणा मार्गावरच काही दिवसांपूर्वी एक कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याने व सदर रूग्णाचा संपर्क अनेकांशी आल्याने चिंता वाढली होती. आता यात आणखी भर पडली असुन पंढरपूर शहरात नव्याने आणखी 7 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 

पंढरीतील एका बँकेच्या संचालक असलेला व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे समोर आले होते. या संचालकाच्या संपर्कातील अनेकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. यामधील काहीजणांचे रिपोर्ट आता पॉझिटीव्ह आले आहेत.  


   चित्रीकरण करण्यासाठी मुंबईहून आलेला एक टीव्ही रिपोर्टर, पंढरीतील एका सहकारी बँकेचे 5 संचालक व खाजगी दवाखान्यात उपचार घेणारा एक अशा 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या सर्वांना प्रशासनाने विलगीकरणमध्ये ठेवले आहे. पंढरीतील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या आता एकुण 8 एवढी झाली आहे. 

रूग्णामध्ये पंढरी नगरी कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अहोरात्र अफाट कष्ट घेत असलेल्या एका प्रमुख प्रशासकीय अधिकारी यांच्या ड्रायव्हरचा सुध्दा समावेश आहे.  त्यामुळे ऐन आषाढी वारीच्या काळातच संबंधित अधिका-यांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे.


पंढरपुरात नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण कर्मवीर भाऊराव औदुंबर पाटील नगर, जुनी पेठ, नवी पेठ व प्रदक्षिणा मार्गावरील असल्याचे समजते. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. 

ऐन आषाढी यात्रेच्या कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह  आढळत असल्यामुळे भाविकांसह शहरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.