चिंताजनक... पंढरीत आढळुन आलेल्या ‘त्या’ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात 145 जण.... संपर्कातील आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता!


         Pandharpur Live -  प्रशासनाच्या कुशल नियोजनामुळे कोरोनामुक्त झालेल्या भुवैकुंठ पंढरी नगरीत ऐन आषाढी वारीच्या तोंडावरच 1 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आल्याने कांही दिवसांपासुन सुटकेचा नि:श्‍वास सोडलेल्या पंढरपूरकरांची चिंता वाढली आहे.. त्यात सदर रुग्ण हा प्रदक्षिणा मार्गावरचाच निघाल्याने प्रदक्षिणा मार्गच सिल करावा लागला आहे. सदर पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले असुन आतापर्यंत एकूण 145 लोक या सदर रुग्णाच्या संपर्कात आल्याचे समजते. संपर्कात आलेल्या लोकांमध्ये एका शैक्षणिक संस्थेतील व एका बँकेतील कांहीजणांचा समावेश असल्याचे समजते. अजुनही सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांबाबत माहिती घेणेचे कामकाज सुरु असुन संपर्कात आलेल्यांची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
                       ही कोरोना बाधीत व्यक्ती एका सहकारी बँकेत संचालक असून 24 जून रोजी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये या रुग्णाचा सहभाग होता त्यामुळे बँकेतील संपर्कात आलेलेले 12 जण जास्त जोखमीचे तर 13 जण कमी जोखमीचे असल्याचे समजते.

                           याचबरोबर ही कोरोना बाधीत व्यक्ती ज्या शाळेत शिक्षक आहे त्या शाळेत जास्त जोखमीचे 51 व कमी जोखमीचे 94 अशा एकुण 145 जणांच्या संपर्कात सदर रुग्ण आल्याचे समजते. रुग्णाच्या उपस्थितीतच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले गेले. त्यामुळे संपर्कात आलेल्यांमध्ये कांही विद्यार्थ्यांचाही समावेश असुन हे विद्यार्थी कमी जोखमीचे असल्याचे समजते.  शाळेत एकूण 80 जणांच्या संपर्कात सदर कोरोना बाधीत रुग्ण आलेला होता. त्याशिवाय इतर ठिकाणी संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये जास्त जोखीमीचे 15 तर कमी जोखीमीचे 25 अशी आकडेवारी समजते. याशिवाय आणखी कोण कोण संपर्कात आले आहेत अशांची माहिती मिळविण्याचे काम सुरु असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.

सदर कोरोना पोॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांपैकी  बँकेतील जास्त जोखमीचे 12, कमी जोखमीचे 13 असे एकूण 25 जण. तर शाळेतील जास्त जोखमीचे 14, कमी जोखमीचे 66 असे एकूण 80 जण आणि इतर गर्दीच्या व अन्य ठिकाणी संपर्क झालेल्यांमध्ये जास्त जोखमीचे 25 तर कमी जोखमीचे 15 असे एकूण 40 लोक आहेत.

अजुनही ट्रेसिंग सुरु असुन संपर्कात आलेल्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. कमी जोखमीच्या लोकांना होम क्वारंटाईन तर अति जोखमीच्या लोकांना संस्था क्वारंटाईन केले जाणार आहे. या लोकांना पंढरपूर शहरातच क्वारंटाईन केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.