कोरोनाच्या संकटकाळातच पंढरीत मेडीकल दुकानदारास 3 जणांनी केली लाथाबुक्क्याने मारहाणPandharpur Live -
संपुर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहे, या काळात आपला जीव धोक्यात घालुन अत्यावश्यक सुविधा म्हणून काही मेडिकल दुकानदार आपली दुकाने उघडी ठेवून कोरोना योध्दा म्हणून कार्यरत आहेत.  परंतु या संकटकाळातच पंढरीतील लिंक रोडच्या एका मेडीकल दुकानदारास दुकानाजवळच 3 आरोपींनी लाथाबुक्क्याने मारहाण करत दुकानातील साहित्याची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
याबाबत पोलिसाांकडून समजलेल्या माहितीनुसार दि. 21 जुन 2020 रोजी रात्री 10 वाजता लिंंक रोडवरील आर्या मेडिकल चे चालक सागर दिलीप शेंडगे (रा.शासकीय वसाहत, पंढरपूर) हे आपल्या लिंक रोड वरील आर्या मेडिकल येथे असताना तेथे आरोपी सोन्या कोकाटे, विशाल जगन्नाथ देवकर, ओंकार विकास देवकर (सर्व रा. इसबावी, पंढरपूर) हे तिघेजण गि-हाईक बनुन आले. 

यावेळी पैसे देणे-घेणेच्या कारणावरून त्यांनी मेडिकल चालक सागर दिलीप शेंडगे यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच दुकानातील पाण्याचा जरा, सॅनिटायझरच्या बाटल्या, दुकानाच्या प्लेटचे नुकसान केले. अशी फिर्याद सागर दिलीप शेंडगे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द भादवि 323, 504, 506, 427, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोहेकाँ. गायकवाड हे करत आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका मेडीकल दुकानदारास सेवेत असताना झालेल्या या मारहाणीमुळे मेडीकल दुकानदारांमधुन संताप व्यक्त होत आहे.