मंगळवेढयात धक्कादायक घटना... आयुष्यभर सांभाळण्याचं आमिष दाखवत डॉक्टरकडून नर्सवर वारंवार बलात्कार... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

Friday, 19 June 2020

मंगळवेढयात धक्कादायक घटना... आयुष्यभर सांभाळण्याचं आमिष दाखवत डॉक्टरकडून नर्सवर वारंवार बलात्कार...


Pandharpur Live -
मंगळवेढा येथे रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सला डॉक्टरने तुला आयुष्यभर सांभाळेन असं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर नर्सने हॉस्पिटलमध्येच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतुन घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.  याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.  

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

तु मला खूप आवडते, मी तुला आयुष्यभर सांभाळतो असे म्हणत डॉ.प्रशांत नकाते यांनी फिर्यादी नर्सशी वारंवार शरीर संबध ठेवल्याने नर्सने दवाखाण्यातच स्वतःच्या अंगावर  पेट्रोल ओतुन घेवुन पेटवुन घेतले .

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी समर्थ हॉस्पीटल मुरलीधर चौक मंगळवेढा  येथे ऑक्टोबर 2017 पासुन कामास होती. डॉ.प्रशांत प्रभाकर नकाते यांनी फिर्यादीस मला तु मला खुप आवडते तुला मी आयुष्यभर संभाळेन असे म्हणून दिनांक 05/06/2019 रोजी पासुन ते दिनांक 26/04/2020 रोजी पर्यंत समर्थ हॉस्पीटल मंगळवेढा येथे माझ्या इच्छेविरूध्द वेळोवेळी शरीर संबध ठेवले.

तसेच त्याच्या पासुन फिर्यादिस दिवस गेल्याने आरोपीने जबरदस्तीने गोळ्या देवुन फिर्यादीचा गर्भपात केला आहे व कोणास काही सांगितल्यास तुला व तुझ्या घरातील लोकांना मारून टाकतो अशी धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.

Ad