जिल्हा स्तरावर बी.एच.एम.एस. डॉक्टरांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करावी-डॉ. पल्लवी पाटील

Pandharpur Live-   
पंढरपूर (प्रतिनिधी):- जिल्हास्तरावर  बी.एच.एम.एस. डॉक्टरांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करावी अशी मागणी पंढरपूर येथील डॉ.पल्लवी पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना या मागणीसंदर्भातला ई-मेल त्यांनी नुकताच पाठविला आहे.
   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!बृृहन्मुंबई येथे नुकत्याच वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियुक्या करण्यात आल्या. या धर्तीवर बी.एच.एम.एस. या डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूका कराव्यात. भविष्यात अनेक वैद्यकीय अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची गरज पडू शकते . ऐनवेळी ते उपलब्ध होतीलच असे नाही. सदर गोष्टींचे गांभीर्य पाहता आम्ही स्वईच्छेने वैद्यकीय सेवा करण्यासाठी तयार आहोत. जिल्हास्तरावरुन सदर नेमणुकीची कार्यवाही व्हावी जेणेकरुन सर्व डॉक्टरांना समान न्याय व संधी मिळेल. वरील मागण्यांचा आपत्कालीन काळात पुर्वतयारी या दृष्टीने विचार व्हावा, असे डॉ. पल्लवी पाटील यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.