पंढरपुरातील सर्व संस्थात्मक विलगीकरण कक्ष तसेच कोविड केअर सेंटर MIT वाखरी पंढरपूर येथे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप-डॉ पल्लवी पाटील


Pandharpur Live -
केंद्रीय आयुष मंत्रालय, भारत सरकार प्रमाणित आर्सेनिकम अल्बम 30 या रोगप्रतिकारक तसेच कोविड19 प्रतिबंधक औषध हे मे महिन्यापासून पंढरपूर मधील सर्व संस्थात्मक विलगिकरण कक्षामध्ये असणार्‍या लोकांना पंढरपूरचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहे अशी माहिती डॉ पल्लवी पाटील यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे आर्सेनिकम अल्बम 30 हे औषध कोविड केअर सेंटर चखढ वाखरी पंढरपूर येथील पॉझिटिव्ह आणि हाय रिस्क कॉन्टेेक्टेड रुग्णांना देखील देण्यात आली आहेत.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
 आतापर्यंत आर्सेनिक अल्बम30 हे औषध न्यू सातारा संकुल, पै दिगंबर महाराज मठ, श्री विठ्ठल ग्यानबा तुकाराम महाराज मठ, तनपुरे महाराज मठ, केंद्रे महाराज मठ, के बी पी कॉलेज पंढरपूर येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात असणार्‍या लोकांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर विलागीकरण काशात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सफाई कर्मचारी यांना देखील आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या देण्यात आल्या आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील बरह्मपुरी  येथे विवेकानंद शिवाजीराव पाटील यांच्या स्मरणार्थ आर्सेनिक अल्बम 30न्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या प्रत्येकी 5 आणि लहान मुलांना प्रत्येकी 2 या प्रमाणात 3 दिवस देणे, गोळ्या घेतल्यानंतर 1 तास अन्न पाणी न घेणे, आणि या 3 दिवसांमध्ये कच्चा कांदा, कच्चा लसूण , कॉफी यांचे सेवन करू नये आदी सूचना करण्यात येत आहेत.

या गोळ्यांबरोबरच मानसिक आरोग्य सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी योगा, व्यायाम, प्राणायाम करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विलागीकरण कक्षात असणार्‍या लोकांची दैनंदिन आरोग्य तपासणी होत आहे. अशा प्रकारे संस्थात्मक विलगिकरण कक्षात असणार्‍या लोकांची नागरपालिकेकडून काळजी घेतली जात आहे. यासाठी विलगिकरण कक्षात असणार्‍या लोकांनी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, डॉ. बी.धोत्रे, डॉ. राजश्री सालविठ्ठल, डॉ. वृषाली पाटील, डॉ. पल्लवी पाटील आणि पंढरपूर नगरपालिका कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.